Mister Mummy : जेनेलिया डिसूझाने पूर्ण केले 'मिस्टर मम्मी'चे शूटिंग; रितेशसोबत झळकणार मोठ्या पडद्यावर
Mister Mummy : रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा लवकरच 'मिस्टर मम्मी' सिनेमात दिसणार आहे.
Mister Mummy : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझाचा (Genelia D'Souza) 'मिस्टर मम्मी' (Mister Mummy) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच जेनेलियाने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
जेनेलियाने सोशल मीडियावर 'मिस्टर मम्मी'चे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, 'मिस्टर मम्मी' सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सिनेमाची कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. शार अली यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
'मिस्टर मम्मी' या रितेश आणि जेनेलियाच्या आगामी सिनेमाची निर्मीती भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत यांनी केली आहे. जेनेलिया आणि रितेश यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली. त्यांची पहिली भेट 2003 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. या सिनेमामुळे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. नंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या