एक्स्प्लोर

Sanjay Dutt : कॅन्सरवर मात केल्यावर संजयनं शूट केला KGF2 चा क्लायमॅक्स सीन; म्हणाला...

केजीएफ 2 चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलेल्या अनुभवाबाबत संजय दत्तनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Sanjay Dutt : लवकरच प्रदर्शित होणाऱ्या केजीएफ 2 या चित्रपटामधील संजय दत्तनं (Sanjay Dutt)  भूमिकेची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये तो अधिरा ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कोविड भारतात मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्याचवेळी अभिनेता संजय दत्तच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती.  कॅन्सरवर मात केल्यानंतर संजयने प्रथम केजीएफ 2 (K.G.F: Chapter 2) चे शूटिंग सुरू केले. अशा परिस्थितीत हे करणे किती कठीण होते, याबाबत संजयनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 

संजय  म्हणाला की 'होय, हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही आव्हानात्मक होते. माझ्यावर उपचार सुरू होते, केमोचे सत्र सुरू होते आणि जेव्हा मी क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू केले तेव्हा देखील ते सुरूच होते. त्यातून सुटका नव्हती. तुम्हाला ते करावेच लागते जे तुम्हाला करायचे आहे. मात्र जेव्हा तुमच्या जीवनात रॉक-सॉलिड सपोर्ट सिस्टीम असेल तेव्हा ते करणे सोपे होते. माझ्या कुटुंबाची ताकद आणि उत्कटतेच्या जबाबदारीने मला अभिनयात परत आणण्यासाठी मला मानसिकदृष्ट्या धैर्यवान आणि उत्साही ठेवले. कुटुंब माझी सपोर्ट सिस्टम आहे. मी 'कधीही हार मानू नका' या ब्रीदवाक्यासोबत वाढलो आहे. आज मी कर्करोगमुक्त आहे आणि नॉर्मल आयुष्य जगतो आहे.'

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयच्या तब्येतीला लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि मेकर्सनी संजय दत्तला बॉडी डबलची मदत घेण्याचा सल्ला दिला, पण संजयने बॉडी डबलशिवाय संपूर्ण सीन स्वत: शूट केला. याविषयी संजय दत्त म्हणतो, "त्यांनी ग्रीन पडद्यावर चित्रीकरण करावं असं सुचवलं होतं. पण एक अभिनेता म्हणून या चित्रपटाचं अचूक शूटिंग करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." अशा प्रकारे अभिनेत्याने संपूर्ण टीमला हाय एनर्जी सीन्स शूटिंगपासून वाचवले. केमोथेरपीनंतर इतक्या अडचणींचा सामना केल्यावर शरीर इतकं अशक्त होतं तरीही, संजय दत्त पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये आला आणि संपूर्ण सीन स्वतः शूट केला. त्यामुळे या अपार परिश्रमाने आपण निश्चितपणे म्हणू शकतो की केजीएफ 2 साठी दत्त हाच खरा तारणहार आहे. 

संजय दत्तकडे अनेक अडचणींचा सामना करून देखील अफाट दृढता आणि सहनशीलता आहे. अभिनेत्याने "मैं आ रहा हूँ अपनी केजीएफ लेने" हे कोणत्या परिस्थिती म्हटले हे सर्वात महत्त्वाचे आहे. दर्शक या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Ashok Saraf KBC: 'दोघांनीही आपला खोकला फेमस केला'; अशोक सराफ यांची KBCमध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर संकर्षण कऱ्हाडे म्हणाला...
'दोघांनीही आपला खोकला फेमस केला'; अशोक सराफ यांची KBCमध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर संकर्षण कऱ्हाडे म्हणाला...
Riteish Deshmukh: रितेश देशमुखला चाहत्याकडून खास भेटवस्तू, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो पाहताच अभिनेत्याने केलं असं काही की... VIDEO व्हायरल
रितेश देशमुखला चाहत्याकडून खास भेटवस्तू, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो पाहताच अभिनेत्याने केलं असं काही की... VIDEO व्हायरल
Priya Bhavani Shankar: अनिरुद्ध - काव्यानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा; प्रिया भवानी शंकर अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंडला बनवलं जीवनसाथी
अनिरुद्ध - काव्यानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा; प्रिया भवानी शंकर अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंडला बनवलं जीवनसाथी
Anirudh Ravichander and Kavya Maran: चर्चांना पूर्णविराम! काव्या-अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले; लग्नातील पहिला PHOTO समोर, दोघांचा लूक पाहिलात का?
चर्चांना पूर्णविराम! काव्या-अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले; लग्नातील पहिला PHOTO समोर, दोघांचा लूक पाहिलात का?

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
Mumbai Local Crime News: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Embed widget