आधी छोट्या भूमिकांमधून खळखळून हसवलं, पण 'धुरंधर'मधल्या 'त्या' भूमिकेनं सर्वांना हादरवलं; रणवीरला लियारीची ओळख करुन देणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत?
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘धुरंधर’मधील या अनपेक्षित परफॉर्मन्सनं या अभिनेत्याची प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकली आहे.

Gaurav Gera: कधी छोट्या-छोट्या भूमिकांमधून खळखळून हसवणारा गौरव गेरा हा अभिनेता, आता मात्र प्रेक्षकांना थक्क करून सोडतोय. कॉमेडीच्या ओळखीपलीकडे जाऊन ‘धुरंधर’मध्ये साकारलेली ‘ती’ भूमिका इतकी प्रभावी ठरली की अनेकांना तो ओळखताच आला नाही. रणवीर सिंगला पाकिस्तानच्या लियारी परिसराची ओळख करून देणारा हा गूढ आणि गंभीर चेहरा नेमका कोण आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘धुरंधर’मधील या अनपेक्षित परफॉर्मन्सनं या अभिनेत्याची प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकली आहे.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 437.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त यांच्यासोबतच गौरव गेराच्या (Gaurav Gera) भूमिकेचंही प्रेक्षक आणि समीक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे. चित्रपटात हिंदुस्तानी गुप्तहेर बनून ज्यूस विकणाऱ्या मोहम्मद आलमच्या भूमिकेत गौरव गेरानं सगळ्यांनाच चकित केलं. त्याचा लूक इतका वेगळा होता की, नेहमी ‘शॉपकीपर’ आणि ‘छुटकी’सारख्या कॉमेडी रोल्समधून ओळखला जाणारा हा तोच गौरव गेरा आहे, हे अनेकांना कळलंच नाही.
कॉमेडी करणारा गौरव, ‘धुरंधर’मध्ये ओळखूच आला नाही
‘धुरंधर’मध्ये हिंदुस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारणारा गौरव गेरा पाकिस्तानमधील ल्यारी शहरात मोहम्मद आलम म्हणून जूस विकताना दिसतो. हरियाणातील महेंद्रगड येथे जन्मलेला गौरव कॉलेजच्या दिवसांपासूनच दिल्लीत ड्रामामध्ये सक्रिय होता. त्याने कॉमेडीही केली. सुमारे तीन वर्षे गुरुग्राममधील ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’मध्ये ‘झमरू’ या लाईव्ह नाटकात त्याने काम केलं. काही काळ तो रेडिओ जॉकीही होता.
2001 पासून टीव्ही करिअरची सुरुवात
2001 मध्ये ‘लाइफ नहीं है लड्डू’ या कॉमेडी शोमधून गौरव गेरानं टीव्ही करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अनेक कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये त्याने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. ‘धुरंधर’मध्ये गंभीर भूमिका साकारणारा गौरव, कॉमेडीमध्ये मात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतो. वेगवेगळ्या भूमिका केल्या तरी त्यानं कॉमेडी कधीच सोडली नाही. त्याचे ‘शॉपकीपर’ आणि ‘छुटकी’ हे कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. यात दुकानदार आणि ‘छुटकी’ नावाच्या मुलीमधील मजेशीर संवाद दाखवले जातात. याशिवाय तो आपला मित्र आणि कॉमेडियन कीकू शारदासोबतही अनेक कॉमेडी व्हिडीओ बनवत असतो.
आईकडूनच मिमिक्रीचा वारसा
एका मुलाखतीत गौरव गेरानं सांगितलं होतं, “माझी आई घरी शेजारी आणि नातेवाइकांची नक्कल करायची. एक नातेवाईक वेगळ्या पद्धतीने बोलायचे. आई त्यांची मिमिक्री करायची आणि ते पाहून मला खूप मजा यायची.”आईचं निरीक्षण खूप चांगलं असून मिमिक्रीची कला मला आईकडूनच मिळाली, असं गौरव म्हणतो.
सोशल मीडियावर पोस्ट, कमेंट्सचा पाऊस
‘धुरंधर’ रिलीज झाल्यानंतर गौरव गेरानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं छाब्रा कास्टिंग आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचे आभार मानले होते. या पोस्टनंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. चाहते त्याला शुभेच्छा देऊ लागले. इतकंच नाही तर फराह खान यांनीही कमेंट करत लिहिलं,
“मी शपथ घेऊन सांगते, संपूर्ण चित्रपटात तुम्ही आहात हे मला ओळखताच आलं नाही.























