आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश
गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा जगभरातील चित्रपटप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा शानदार प्रतिसाद मिळत असून आता हा चित्रपट 100 कोटी क्बलमध्ये सामील झाला आहे.
![आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश Gangubai Kathiawadi box office collection, Alia Bhatt's film earns 100 crore worldwide आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/b626ff172bb579b5bb810b0f1e315ec6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आलिया भटचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. कोरोना महामारीनंतर थिएटर्समध्ये जबरदस्त कमाई करणारा हा तिसरा चित्रपट आहे. संजय लीला भन्सानी यांनी दिग्दर्शित केलेल्या गंगूबाई काठियावाडीला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांचा शानदार प्रतिसाद मिळत आहे. आता हा चित्रपट 100 कोटी क्बलमध्ये सामील झाला आहे. हा सिनेमा जगभरातील चित्रपटप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आलिया भटने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये सामील झाल्याची माहिती खुद्द भन्साली प्रॉडक्शन हाऊसने दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितलं की, गंगूबाई काठियावाडीने जगभरात 108.3 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. ही पोस्ट शेअर करताना एवढं प्रेम देण्यासाठी धन्यवाद असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
आलिया भटच्या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली होती. सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. अनेक ठिकाणी नाईट शो नसल्यानेही चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. अनेक मोठ्या चित्रपटांना गंगूबाई काठियावाडी टक्कर देत आहे.
Gangubai Kathaiwadi : आलिया नाही तर 'या' अभिनेत्रींना दिली होती 'गंगूबाई काठियावाडी'ची ऑफर
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई'वर आधारित आहे. हा सिनेमा गंगूबाई यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतला आहे. गंगूबाईला तिच्या बॉयफ्रेण्डने 1000 रुपयांमध्ये मुंबईतील कामाठीपुरामध्ये विकलं होतं. यानंतर तिने महिलांसाठी लढण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला यासाठी लढा दिला.
गंगूबाई काठियावाडीमध्ये आलियासोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात सर्वांनीच दमदार अभिनय केला आहे. आलियाने साकारलेली गंगूबाई सगळ्यांनाच भावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)