Gangubai Kathaiwadi : आलिया नाही तर 'या' अभिनेत्रींना दिली होती 'गंगूबाई काठियावाडी'ची ऑफर
गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Gangubai Kathaiwadi : आलिया भटचा (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. पण गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिली होती-
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. पण प्रियांकानं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण ती त्यावेळी दोन हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग करत होती.
राणी मुखर्जी (Rani Mukerji)
संजय लीला भन्साळी यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची ऑफर दिली होती. पण नंतर राणी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. राणीनं संज लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटामध्ये काम केले आहे.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये दीपिकानं प्रमुख भूमिका साकारली. अनेकदा दीपिकानं संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसला भेट दिली त्यामुळे दीपिका गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात होते.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट, शांतनु,अजय देवगण विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
- Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये हळहळ, रणवीर सिंहपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
- Sarika : कमल हसनसोबत घटस्फोट अन् मुलीनं सोडली साथ; अभिनेत्री सारिकाचं खडतर आयुष्य
- Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha