(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gandhi Godse Ek Yudh Trailer : विचारांची लढाई! राजकुमार संतोषीच्या 'गांधी गोडसे एक युद्ध'चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांना उत्सुकता
Gandhi Godse Ek Yudh : राजकुमार संतोषीच्या 'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.
Gandhi Godse Ek Yudh Trailer Out Now : 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.
'गांधी गोडसे एक युद्ध'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Gandhi Godse Ek Yudh Trailer Out
'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमाचा ट्रेलर गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे एकंदरीत सिनेमात नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवण्यात येणार आहेत याचा ट्रेलरवरुन अंदाज येतो.
राजकुमार संतोषी यांच्या 'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमाचा टीझर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे प्रेक्षकांना ट्रेलरची उत्सुकता लागली होती. आता ट्रेलर रिलीज झाल्याने चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
1947 साली झालेल्या फाळणीनंतर हिंदू आणि मुसलमान यांच्या निर्माण झालेले वैमनस्य संतोषी यांनी 'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमात मांडले आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुरामाच्या भूमिकेत आहे. तर दीपक अंतानी यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
राजकुमार संतोषी नेहमीच सामाजिक संदेश देणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. आता त्यांच्या 'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमात त्यांचं दर्जेदार लेखन आणि दिग्दर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमुळे प्रेक्षकांना आता या सिनेमाची उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या