Kedar Shinde: 'आपल्यासोबतचे सवंगडी...'; 'फ्रेंडशिप डे'निमित्त केदार शिंदेनं शेअर केली खास पोस्ट
दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी मैत्री दिनानिमित्त (Friendship Day 2023) एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Friendship Day 2023: प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री या नात्याला विशेष स्थान आहे. आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त (Friendship Day 2023) अनेक सेलिब्रिटींनी खास पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी देखील मैत्री दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. केदार शिंदे यांनी मैत्री दिनानिमित्त शेअर केलेल्या फोटोमध्ये काही कलाकार दिसत आहे.
केदार शिंदे यांची पोस्ट
केदार शिंदे यांनी मैत्री दिनानिमित्त एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानी कॅप्शन दिलं, 'काही गोष्टींची सुरूवात करताना आपल्यासोबतचे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं. कोण कोण आहेत? ओळखलत तर कमेंट्समध्ये सांगा.'
केदार शिंदेनं शेअर फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी फोटोमधील कलाकार ओळखण्याचा प्रयत्न केला. एका नेटकऱ्यानं केदारच्या फोटोला कमेंट केली, 'भरत जाधव,अंकुश चौधरी,अरुण कदम' केदारनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', 'श्रीमंत दामोदरपंत','तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' अशा अनेक नाटकांमध्ये केदार शिंदे यांनी काम केलं.
केदार शिंदे यांचे चित्रपट
केदार शिंदे यांनी 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. केदार शिंदे यांनी 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'तो बात पक्की' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब, सुकन्या कुलकर्णी,सुचित्रा बांदेकर, सुरुची अडारकर, शिल्पा नवलकर आणि शरद पोंक्षे या कलाकारांनी बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला तसेच चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
केदार शिंदे हे सोशल मीडियावरुन त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतात. केदार शिंदे यांना 21.8K फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kedar Shinde : सही नाटकं आणि भारी चित्रपट, 'असा' आहे दिग्दर्शक केदार शिंदेंचा पडद्यामागचा प्रवास