एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात

केजीएफ 2' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलीच कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता या सिनेमाच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्री-बुकिंग सुरु झाल्यापासून 12 तासांत या सिनेमाने पाच हजारांहून अधिक तिकिटे विकली आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाची तिकिटे विकली गेल्याने हा सिनेमा अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असे म्हटले जात आहे. 

‘हा’ प्रसिद्ध डिझायनर बनवणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा पेहराव

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, प्रत्येक दिवसागणिक लग्नाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. पाहुण्यांच्या यादीपासून ते स्थळापर्यंत सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, नववधूच्या वेशभूषेबाबत चर्चांना उधाण आले आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे.

मल्याळम सुपरस्टार श्रीनिवासन यांची प्रकृती चिंताजनक

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते श्रीनिवासन यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीनिवासन यांना 30 मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर 31 मार्च रोजी त्यांच्यावर इमर्जन्सी बायपास सर्जरी करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यामुळे त्यांना स्थिर करण्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार श्रीनिवासन ट्रिपल वेसल डिसीजने त्रस्त आहेत.

बंकिमचंद्र चटर्जींच्या ‘आनंदमठ’चा रिमेक येणार

आज 8 एप्रिल हा भारतातील प्रसिद्ध कादंबरीकार महर्षी बंकिमचंद्र चटर्जी यांची 128वी पुण्यतिथी आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून, प्रसिद्ध लेखक आणि निर्माते राम कमल मुखर्जी आणि झी स्टुडिओचे माजी प्रमुख सुजॉय कुट्टी यांनी के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांच्यासोबत त्यांच्या ‘1770 एक संग्राम’ या सुंदर कलाकृतीसाठी सहकार्य केले आहे. ही कथा कलाकृती चॅटर्जी यांच्या सुप्रसिद्ध राष्ट्रवादी बंगाली कादंबरी ‘आनंदमठ’पासून प्रेरित आहे.

‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे पुन्हा साकारणार गाजलेली भूमिका

'नवे लक्ष्य' या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे यांची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. 'नवे लक्ष्य'च्या पहिल्या पर्वात म्हणजेच लक्ष्य मालिकेत रेणुका राठोड आणि सलोनी देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या. त्यामुळे ही गाजलेली पात्र मालिकेत पुन्हा पाहायला मिळतील. या निमित्ताने युनिट 8 आणि युनिट 9 एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वींच्या केसचा गुंता सोडवणार आहेत. अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे जुनी भूमिका नव्याने साकारण्यासाठी सज्ज झाल्या असून 'नवे लक्ष्य'च्या टीमसोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Me Vasantrao : 'मी वसंतराव'चे प्रेक्षकांसह समीक्षकांकडून जोरदार कौतुक

Shahrukh Khan : शाहरुखचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल, 'पठाण'नंतर अॅटली दिग्दर्शित सिनेमाचे शूटिंग सुरू

KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री

महत्त्वाच्या बातम्या

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget