Sameera Reddy Nana Patekar Death: बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'
Sameera Reddy: दिवंगत अभिनेते नाना पाटेकरांबद्दल समीरा रेड्डी नेमकं काय म्हणाली?

Sameera Reddy on Nana Patekar Death: हिंदी सिनेसृष्टीतील (Bollywood) दिवंगत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी 8 ऑक्टोबर रोजी सर्वांनाच धक्का दिला. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना आणि सिने कलाकारांना जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या अनेक मित्र कलाकारांनी नाना पाटेकर (Nana Patekar Death) यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी नाना पाटेकर यांच्यासोबतचे न ऐकलेले किस्से शेअर केले. अनेकांनी नाना पाटेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. अलिकडेच अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) हिने नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. नाना पाटेकर खऱ्या आयुष्यात कसे व्यक्ती होते? याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं.
समीरा रेड्डीने नाना पाटेकरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला (Sameera Reddy Reveals Nana Patekars Secretly Charity Work)
समीरा रेड्डी हिने अलिकडेच हिंदूस्तान टाइम्सशी खास संवाद साधला. आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना तिने उजाळा दिला. अभिनेत्रीने सांगितलं की, 'टॅक्सी नंबर 9211' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान, अभिनेत्री सिनेसृष्टीत नवीन होती. नाना पाटेकर पडद्यामागे समाजसेवा करतात, हे जाणून घेतल्यानंतर तिला आश्चर्य आणि आनंद झाला होता. तिने आपल्या कारकिर्दीत 'डरना मना हैं' आणि 'टॅक्सी नंबर 9211' या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. समीरा रेड्डीने मुलाखतीत सांगितलं की, 'नाना पाटेकर हे अनेक चॅरिटी आणि संस्थांना गुपचूप उदारपणे देणग्या दिल्या आहेत. तसेच आर्थिक मदतही केली आहे'.
'नाना पाटेकरांनी कधीच याचा प्रचार केलेला नाही. किंवा पब्लिसीटीही केलेली नाही. अनेक अभिनेते त्यांच्या चांगल्या कामांबद्दल सतत बोलत असतात. पण त्यांनी सर्वकाही शांतपणे केले. कुणालाही कळू दिले नाही. तेव्हा माझ्या मनात त्यांच्याविषयी आणखी आदर वाढू लागला होता. यासह ते एक जबरदस्त अॅक्टर आहेत', असं समीरा रेड्डी म्हणाली. मुलाखतीत समीराने सांगितलं की, 'अभिनयाच्या बाबतीतही नाना पाटेकर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. 'टॅक्सी नंबर 9211' या सिनेमाच्या शूटिंगवेळी जॉन अब्राहम आणि मी, आम्ही दोघेही तरुण आणि नवोदित कलाकार होतो. ज्या पद्धतीने नाना पाटेकर यांनी शाघव शास्त्री (टॅक्सी ड्रायव्हर)ची भूमिका साकारली, यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं', असं समीरा रेड्डी म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















