Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Deool Band Actress: 'देऊळ बंद' अभिनेत्रीने आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला, कारण काय?

Deool Band Actress Arya Ghare: 2015 साली रिलीज झालेला 'देऊळ बंद' (Deool Band) हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani), निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात आणखी एका बालकलाकाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. 'सना' (Sana) ही भूमिका प्रचंड गाजली. 'सना' ही व्यक्तीरेखा अभिनेत्री आर्या घारे हिने साकारली. अभिनेत्री सोशल मीडियात सक्रीय असते. नुकतंच अभिनेत्रीने एक व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आडनाव बदलत असल्याचं सांगितलं. तिने वडिलांच्या नावाच्या जागी आईचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने (Viral Instagram Video) हा निर्णय का घेतला? याबद्दल तिने व्हिडीओतून खुलासा केला आहे. अभिनेत्री व्हिडीओत नेमकं काय म्हणाली? पाहूयात.
आर्या घारेनं आपलं नाव बदललं, वडिलांच्या नावाजागी आईचं नाव लावलं, कारण... (Deool Band Actress Arya Ghare Changes her name and Surname)
अभिनेत्री आर्याने व्हिडीओ शेअर करत नावापुढे आईचं नाव लावण्यामागचं कारण सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, 'नमस्कार... आजचा हा व्हिडीओ थोडा वेगळा असणार आहे. कारण आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय तुमच्यासोबत शेअर करत आहे. काही निर्णय घ्यायला अजिबात सोपे नसतात. मी माझ्या आयुष्यातील हे सत्य आतापर्यंत तुमच्यासोबत कधीच शेअर केलं नव्हतं. आज, आता जो मी निर्णय घेत आहे, तो खूप आधी मला घ्यायचा होता. पण हा निर्णय मी माझ्या आईमुळे घेतला नव्हता. आता असं वाटलं की बस'.
View this post on Instagram
'आता ती वेळ आली आहे. आजपर्यंत ज्या नावाने आपल्याला लोक ओळखतात. ज्या नावाने आपण मोठे झालो. जे नाव मोठं करण्यासाठी आपण इतकी कष्ट घेतले. ते नाव बदलणं अजिबात सोपं नसतं. पण कधी कधी स्वत:च्या अस्तिवासाठी, स्वत:च्या अभिमानासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही. माझ्यासाठी कधीच काही केलेलं नाही. आजही जी व्यक्ती माझं आणि माझ्या आईचं वाईट कसं होईल, आमची बदनामी कशी होईल, याचा प्रयत्न करतेय. आमच्या आयुष्यात त्रास कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करतेय'.
'त्या व्यक्तीचं नाव माझ्या ओळखीचं भाग म्हणून का मिरवावं? माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे, जिने स्वत:च्या वाटेला कितीही दु:ख, अडचणी, संघर्ष आली, तरी माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ नाही दिलं. स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून, माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. स्वत: खंबीर उभी राहून, मला जगायला शिकवलं. माझ्या आईने जे काही माझ्यासाठी केलं, त्याची परतफेड मी कधीच करु शकणार नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी नव्हतं, तेव्हा माझी आई होती. आज मी जे काही आहे, ते केवळ माझ्या आईमुळे आहे'.
'म्हणूनच आज, आतापासून माझं नाव असेल, आर्या वैशाली. माझे सर्व सोशल मीडियात हँडल आता आर्या वैशाली ऑफिशियल याच नावाने असतील. माझ्या नावासोबत माझ्या आईचं नाव असेल तर, त्याच्यापेक्षा अभिमान माझ्यासाठी कोणताच नाही', असं अभिनेत्री म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















