Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding : फरहान-शिबानी अडकणार लग्नबंधनात, आधी कोर्ट मॅरेज नंतर करणार शाही विवाहसोहळा
Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकरच्या (Shibani Dandekar) लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार असल्याची शक्यता गेले अनेक दिवस वर्तवली जात होती. अद्याप दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी शाही विवाहसोहळा करू शकतात, असे म्हटले जात आहे.
रिपोर्टनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करणार असून एप्रिलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आता त्यांच्या लग्नसोहळ्याची प्रतीक्षा करत आहेत.
View this post on Instagram
फरहान अख्तर लवकरच 'जी ले जरा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Why I Killed Gandhi या चित्रपटावर बंदी आणावी, मौलाना आझाद विचार मंचने केली मागणी
Shahrukh Khan : किंग खानचं कमबॅक, 'पठाण'सह 'या' चित्रपटांच्या शूटिंगलाही करणार सुरुवात
Bigg Boss 15 Finale : पाचही स्पर्धक प्रबळ दावेदार, कोणाच्या गळ्यात पडणार ‘बिग बॉस 15’च्या विजेतेपदाची माळ?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha