Farah Khan: "शाहरुखनं शर्ट काढल्यानंतर मी उलटी केली..."; फराह खाननं सांगितला किस्सा
कोरिओग्राफर फराह खाननं (Farah Khan) एका मुलाखतीत शाहरुखच्या (Shah Rukh Khan) दर्द ए डिस्को या गाण्याचा किस्सा सांगितला.
Farah Khan And Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. शाहरुख हा फिटनेस फ्रिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखनं त्याचे सिक्स पॅक्स दाखवले आहेत. शाहरुखच्या ओम शांती ओम या चित्रपटामधील दर्द ए डिस्को या गाण्यात देखील तुम्हाला शाहरुखचे सिक्स पॅक्स दिसतील. ओम शांती ओम या चित्रपटाला रिलीज होऊन काल (9 नोव्हेंबर) 16 वर्ष झाली आहेत. कोरिओग्राफर फराह खाननं (Farah Khan) एका मुलाखतीत शाहरुखच्या दर्द ए डिस्को या गाण्याचा किस्सा सांगितला. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान जेव्हा शाहरुख शर्ट काढायचा तेव्हा मला उलटी येत होती, असं एका मुलाखतीमध्ये फराहनं सांगितलं.
फराहला का येत होती उलटी?
Film Companion या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये फराह खाननं सांगितलं की,"ओम शांती ओममधील दर्द ए डिस्को या गाण्याच्या शूटिंगवेळी मी प्रेग्नंट होते. तेव्हा मला सतत नॉशिया वाटत होता. दर्द ए डिस्को गाण्याचं शूट सुरु असताना शाहरुखने शर्ट काढल्यानंतर मी सेटवर ठेवलेल्या बादलीत उलटी केली होती. मी तेव्हा शाहरुखला सांगत होते की, तुझी बॉडी बघून मला उलटी होत नाहीये तर प्रेग्नन्सीमुळे मला असं होतं आहे."
'ओम शांती ओम'ची स्टार कास्ट
शाहरूख खानसोबतच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) , श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अर्जुन रामपाल (Arjun rampal) यांनी या देखील ओम शांती ओम या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
डायलॉग्सनं जिंकली प्रेक्षकांची मनं
'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो महेश बाबू...', ओम शांती ओम या चित्रपटामधील दीपिकाच्या डायलॉगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. "इतनी शिद्दत से मैंने, तुम्हें पाने की कोशिश की है, कि हर जर्रे ने मुझे, तुमसे मिलाने की साजिश की है" या शाहरुखच्या डायलॉगनं देखील अनेकांचे लक्ष वेधले.
शाहरुखचे आगामी चित्रपट
पठाण आणि जवान या चित्रपटानंतर शाहरुखचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 'डंकी' हा बहुचर्चित चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, दिया मिर्झा, धर्मेंद्र, बोमन इराणी, सतीश शाह महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या: