Rashmika Mandanna : एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत झळकणार, संदीप रेड्डी वांगा करणार दिग्दर्शन
Rashmika Mandanna : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमात आता रश्मिका मंदानाची एन्ट्री झाली आहे.
Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandanna) अनेक बॉलिवूड सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अशातच रश्मिकाची रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'(Animal) सिनेमात एन्ट्री झाली आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या विरोधात दिसणार आहे.
'अॅनिमल' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदाना आधी परिणीती चोप्राला या सिनेमासाठी विचारण्यात आले होते.'अॅनिमल'या सिनेमाच्या शूटिंगला जून महिन्यात सुरुवात होणार आहे.
View this post on Instagram
'अॅनिमल' या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. भूषण कुमार आणि कृष्णा कुमार यांची 'टी-सीरिज', प्रणय रेड्डी वंगाचे 'भद्रकाली पिक्चर्स' आणि मुराद खेतानी यांचा 'सिने 1 स्टुडिओ' 'अॅनिमल' या गुन्हेगारी सिनेमाची निर्मिती करणार आहे.
संबंधित बातम्या
Lochya Zala Re : प्रेमाचे रंग उधळणारा 'लोच्या झाला रे' आता अॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित
TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर 'या' पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई
Mika Singh : '... म्हणून मी 20 वर्षात लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या 150 मुलींना नकार दिला'; मिका सिंहनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha