Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'तुझेच मी गीत गात आहे’; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Tujhech Mi Geet Gaat Aahe : तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळाला स्वराजनं एका खोलीमध्ये कोंडलं आहे.
Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 5: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. मात्र, सोमवारी आणि आता मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली होती. 'जरा हटके जरा बचके'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी किती कमाई केली? ते जाणून घेऊयात...
Adipurush Trailer: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
Actress Sulochana: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana) यांच्या पार्थिवावर उद्या, 5 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सुलोचना दीदी यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Shark Tank India 3 : 'शार्क टँक इंडिया 3' लवकरच होणार सुरू
Shark Tank India Season 3 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता या कार्यक्रमाचं नवं प्रर्व अर्थात 'शार्क टॅंक इंडिया 3' (Shark Tank India 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. देशभरातील उद्योगकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे.
Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचं निधन
Aamir Raza Husain Passed Away : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain Passed Away) यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी झाला. आमिर यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. अजमेरमध्ये शिक्षण घेत असतानाचा त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. आमिर राज यांनी 'बाहुबली' 'आरआरआर' या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -