एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2'

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Jailer Movie Marathi Actor : रजनीकांतच्या 'जेलर'मध्ये झळकलेत दोन मराठमोळे चेहरे; एकाची तर थलायवासोबतच एन्ट्री

Jailer Movie Marathi Actor : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) हा सिनेमा सध्या देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रजनीकांतचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'जेलर' हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. रजनीकांतच्या 'जेलर' या सिनेमात दोन मराठी कलाकारांनी काम केलं आहे.मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) आणि गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) या मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या दोन कलाकारांनी 'जेलर' या सिनेमात काम केलं आहे. गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत एन्ट्री घेतली आहे. मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते कौतूकाचा वर्षाव करत आहेत.

Hema Malini : एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी : हेमा मालिनी

Hema Malini : 'सोसायटी अचिव्हर्स' या मासिकाच्या अनावरण सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), योगी आणि त्यांच्या मथुरेबद्दल भाष्य केलं. दरम्यान मोदी एकटेच सर्वांना भारी, आता कोणाचीही पाळी येणार नाही, असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केलं. 

KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन

Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 14 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती 15' सुरू होत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक प्रिया पाटीलने (Priya Patil) डिझाइन केला आहे.

16:37 PM (IST)  •  14 Aug 2023

Milind Gawali: "रागावणं, चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला..."; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मिलिंद हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या भेटीस येतात. तसेच मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. नुकतेच मिलिंद गवळी यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

15:46 PM (IST)  •  14 Aug 2023

Seema Haider: सीमा हैदरने दिल्या ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; चित्रपटाची ऑफर नाकारली

Seema Haider: पाकिस्तानची  सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) या  जोडप्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सीमा आणि सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहे. 

14:53 PM (IST)  •  14 Aug 2023

Girish Oak : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत येणार ट्वि्स्ट; डॉ. गिरीश ओक दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

Girish Oak Entry In Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्मिते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत अभिनेते डॉ. गिरीश ओक (Girish Oak) यांची एन्ट्री होणार आहे. गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

14:49 PM (IST)  •  14 Aug 2023

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh: 'तुमच्याशिवाय जगणे ...'; विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलिया आणि रितेश भावूक, शेअर केली पोस्ट

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh:  महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (14 ऑगस्ट) पुण्यतिथी आहे.  14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले. नुकतीच विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच रितेशची पत्नी जिनिलियानं (Genelia Deshmukh) देखील इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

13:51 PM (IST)  •  14 Aug 2023

Box Office : थिएटरमधल्या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

Box Office Collection : मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा बहरली आहे. एकीकडे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेले सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जात आहेत. तर दुसरीकडे 12 ते 15 ऑगस्ट या लॉन्ग वीकेंडचा सिने-निर्मात्यांना चांगलाच फायदा झाला आहे. देवदर्शन आणि पर्यटनाला जाण्यासह सिनेप्रेमींची पाऊले सिनेमागृहाकडे वळली आहेत. एकंदरीतच थिएटरमधल्या या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला पाहायला मिळाला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीतCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
Embed widget