Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट' नाटकाने रंगभूमी बहरली; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Aug 2023 05:38 PM
KBC 15: ‘जंगल बुक’वर आधारित असणाऱ्या 'या' प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही केबीसीमध्ये आलेला स्पर्धक; तुम्हाला माहितीये का उत्तर?
25 लाखाच्या बक्षीसासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर आनंद राजू यांना देता आले नाही. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का? Read More
Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट' नाटकाने रंगभूमी बहरली; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'
Jar Tarchi Goshta : 'जर तर ची गोष्ट' या नाटकाचे आतापर्यंतचे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत. Read More
Kalavantancha Ganesh : "बाप्पा कायम माझ्या पाठीशी"; 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम कार्तिकी गायकवाडला आवडतं गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करायला
Kalavantancha Ganesh : कार्तिकी गायकवाडसाठी (Kartiki Gaikwad) प्रत्येकवर्षीचा गणेशोत्सव हा खूप खास आहे. Read More
Jawan New Song Out: 'जवान' मधील 'नॉट रमैया वस्तावैया' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; शाहरुख खान आणि नयनतारा यांचा जबरदस्त डान्स
Jawan New Song Out: 'नॉट रमैया वस्तावैया' या गाण्यात शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनतारा यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे. Read More
Prabhas Bald Look : आदिपुरुष' फ्लॉप झाल्याने प्रभासला पडलं टक्कल? फोटो पाहून चाहते हैराण
Prabhas New Look : प्रभासचा डोक्यावर केस नसलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Miss World 2023: मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा काश्मीरमध्ये होणार; 27 वर्षांनी भारताकडे स्पर्धेचे यजमानपद
मिस वर्ल्ड 2023 ही स्पर्धा (Miss World 2023) काश्मीरमध्ये होणार आहे. Read More
Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर यांना चाहतीनं दिलं खास गिफ्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, 'मन इतकं भरून येतं...'
एका चाहतीनं दिलेल्या गिफ्टचा व्हिडीओ मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
Rama Raghav : 'रमा राघव' मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग! बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन...
Rama Raghav : 'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग रंगणार आहे. Read More
Jawan Trailer : शाहरुखच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला! बुर्ज खलिफावर होणार'जवान'च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग
Jawan Trailer : शाहरुख खानच्या 'जवान'च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग बुर्ज खलिफावर होणार आहे. Read More
Yaariyan 2: 'यारियां 2' मधील गाण्यातील एका सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिलं स्पष्टीकरण
यारियां 2 (Yaariyan 2) हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे. Read More
Prakash Raj: 'चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा'; स्वामी चक्रपाणी यांच्या मागणीवर अभिनेते प्रकाश राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले....
अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj)  यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. Read More
Sachin Sawant : आयआरएस अधिकारी सचिन सावंत मनी लाँड्रिंगप्रकरणात मोठी माहीती

Sachin Sawant : सावंतांवर  ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने गेल्या वर्षी जूनमध्ये सावंत यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून जूनमध्ये त्याला अटक केली आहे.

Sachin Sawant : आयआरएस अधिकारी सचिन सावंत मनी लाँड्रिंगप्रकरणात मोठी माहीती

Sachin Sawant : सावंतांवर  ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने गेल्या वर्षी जूनमध्ये सावंत यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून जूनमध्ये त्याला अटक केली आहे.

Subhedar : 'सुभेदार' सिनेमा महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थांना सवलतीच्या दरात पाहता येणार; विशेष ऑफर काय? जाणून घ्या...
Subhedar : 'सुभेदार' हा सिनेमा महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थांना सवलतीच्या दरात पाहायला मिळणार आहे. Read More
Aamir Khan : सरकारी वकील उज्जवल निकम यांचा जीवनपट उलगडणार! आमिर खान दिसणार मुख्य भूमिकेत
Ujjwal Nikam Biopic : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.


Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट


Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. 


Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"


Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.