एक्स्प्लोर

Kalavantancha Ganesh : "बाप्पा कायम माझ्या पाठीशी"; 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम कार्तिकी गायकवाडला आवडतं गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करायला

Kalavantancha Ganesh : कार्तिकी गायकवाडसाठी (Kartiki Gaikwad) प्रत्येकवर्षीचा गणेशोत्सव हा खूप खास आहे.

Kartiki Gaikwad On Kalavantancha Ganesh : विघ्नहर्ता गणपती बाप्पावर (Ganapati Bappa) अनेकांची नितांत श्रद्धा असते. गणेशोत्सवाचं स्वत:चं वेगळं महत्तव आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आहे. गणपती बाप्पा हा प्रत्येकासाठीच खास असतो. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसाठीदेखील खास असतो. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम (Sa Re Ga Ma Pa Little Champs) कार्तिकी गायकवाडसाठीदेखील (Kartiki Gaikwad) बाप्पा खूप खास आहे. गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करताना तिला खूप आनंद मिळतो.  

कार्तिकी गायकवाड आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे? 

एबीपी माझाशी बोलताना कार्तिकी म्हणाली,"गणपती बाप्पा माझ्या कायम पाठीशी आहे..आशीर्वाद आहेच. बाप्पा फक्त 10 दिवस नव्हे तर अखंडीत आपल्यासोबत आहेत. पण बाप्पा घरी येतात तेव्हा दहा दिवसांचा माहोलच वेगळा असतो. बाप्पासमोर रियाज करणं. कार्यक्रम सादर करणं..गणेशोत्सवात कार्यक्रम सादर करताना एक वेगळाच आनंद असतो. एकंदरीत बाप्पा आले की सर्वत्र सकारात्मकता येते. बाप्पाची मूर्ती निवडण्यापासून, सजावट ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यात वेगळीच गंमत असते. कुटुंबातील सर्व मंडळी मिळून आम्ही हा सण साजरा करतो". 

Kalavantancha Ganesh :

बाप्पा माझ्या कायम पाठीशी : कार्तिकी गायकवाड

बाप्पाबद्दल बोलताना कार्तिकी म्हणाली,"प्रत्येक क्षणी वाटतं की, बाप्पा माझ्या पाठीशी आहे. गाणं सादर करायचं म्हटलं तरी गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेतच. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणरायाचे मंगलमय स्मरण करून करतो. माझ्या कार्यक्रमात माझं पहिलं गाणं हे बाप्पाचं असतं. त्यामुळे बाप्पा कायम आपल्या पाठीशी आहे, असं वाटतं. बाप्पा आले की आमच्या घरचं वातावरण सकारात्मकतेने भरलेलं असतं. बाप्पाच्या मूर्तीकडे बघत बसणं किंवा आई जे प्रसादाला बनवते ते खाणं या सगळ्यात एक उत्साहाचं वातावरण असतं". 

कार्तिकी गायकवाडच्या आठवणीतला गणेशोत्सव कोणता? 

आठवणीतल्या गणेशोत्सवाबद्दल बोलताना कार्तिकी म्हणते,"दरवर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास असतो. गणेशोत्सवादरम्यान आमच्या 'स्वरानुभूती' या कार्यक्रमाचा 100 वा प्रयोग आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवासाठी केला होता. ही गणेशोत्सातील आठवणीत राहणारी एक गोष्ट आहे. आपलं गाणं बाप्पासमोर सादर होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे".Kalavantancha Ganesh :

कार्तिकी गायकवाड दरवर्षी बाप्पाची सुंदर आरास बनवते.  यंदा बाप्पाची आरास नैसर्गिक करण्याचा तिचा विचार आहे. पर्यावरणपूरक सजावट करण्यावर यंदा भर असेल तसेच यंदाची थीम ही निसर्गाशी निगडीत आहे, असं कार्तिकी म्हणाली.  

संबंधित बातम्या

Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन; पाहा फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget