Animal Pre Release Event: 'तेलुगू स्टार्स हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करतील', मंत्री मल्ला रेड्डींचं वक्तव्य, म्हणाले, 'मुंबई जुनी झाली, आता हैदराबादमध्ये शिफ्ट व्हा!'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Nov 2023 07:43 PM
Kho Gaye Hum Kahan: प्रतीक्षा संपली! सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरवच्या ‘खो गए हम कहां’ ची रिलीज डेट जाहीर, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार चित्रपट
Kho Gaye Hum Kahan: 'खो गए हम कहां' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Animal Pre Release Event: "तेलुगू स्टार्स हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करतील", मंत्री मल्ला रेड्डींचं वक्तव्य, म्हणाले, "मुंबई जुनी झाली, आता हैदराबादमध्ये शिफ्ट व्हा!"
'अ‍ॅनिमल' (Animal) चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी (Malla Reddy) यांनी देखील हजेरी लावली. यावेळी मल्ला रेड्डी यांनी बॉलिवूड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल वक्तव्य केलं. Read More
International Film Festival: इफ्फीमध्ये नाटू नाटू गाण्यावर थिरकले हॉलिवूड स्टार मायकेल डग्लस; भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल म्हणाले...
International Film Festival: इफ्फीचा मंचावर मायकेल डग्लस यांनी आरआरआर (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर डान्स देखील केला. तसेच यावेळी मायकेल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे कौतुक देखील केलं. Read More
Vicky Kaushal: ‘टायगर 3’ मधील ‘टॉवेल फाईट’ पाहिल्यानंतर विकी कतरिनाला म्हणतो, "मी तुझ्याशी आता वाद घालणार नाही कारण..."
'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटामधील ‘टॉवेल फाईट’  सीनवर कतरिनाचा पती विकी कौशलनं (Vicky Kaushal) प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Main Atal Hoon : पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूँ' सिनेमाची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Shweta Bachchan husband Nikhil Nanda: बिग बींच्या जावयाचं शिक्षण किती? प्रसिद्ध उद्योगपती अन् कपूर घराण्याशी खास नातं; जाणून घ्या श्वेता बच्चनच्या पतीबद्दल...
Shweta Bachchan husband Nikhil Nanda: श्वेताचे पती निखिल नंदा (Nikhil Nanda) हे लाईमलाईटपासून दूर असतात. जाणून घेऊयात निखिल नंदा यांच्याबद्दल...  Read More
Pushpa 2 OTT : सिनेमागृहात धमाका केल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' ओटीटीवर होणार रिलीज! इतक्या कोटींमध्ये झाली डील
Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. Read More
20 Years Of Kal Ho Naa Ho: 'कल हो ना हो'ची 20 वर्षे; करण जोहरनं शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाला, "मी हा चित्रपट पाहतो तेव्हा प्रत्येक फ्रेममध्ये..."
'कल हो ना हो' (Kal Ho Naa Ho) या चित्रपटाला रिलीज होऊन 20 वर्षी झाल्यानं करण जोहरनं नुकतीच एक भावून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Read More
London Misal Trailer : फुल टू धमाल... भरत जाधव, गौरव मोरेच्या 'लंडन मिसळ'चा ट्रेलर रिलीज
London Misal : 'लंडन मिसळ' या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
World Richest Actress : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? सिनेमे फ्लॉप पण कोट्यवधींची मालकीण
Jami Gertz : अभिनेत्री जामी गर्ट्ज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. Read More
Rashmika Mandanna: "हे भीतीदायक आहे, मी महिलांना आवाहन करू इच्छितो की..."; डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत बोलली रश्मिका
Rashmika Mandanna: रश्मिकानं डीपफेक व्हिडीओ आणि चित्रपटसृष्टीतून तिला मिळालेल्या पाठिंबा याबद्दल सांगितलं. Read More
Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेने विकी जैनला दिली घर सोडण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
Ankita Lokhande Vicky Jain : 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद होताना दिसत आहे. अशातच अभिनेत्रीने विकीला घर सोडण्याची धमकी दिली आहे. Read More
Jhimma 2 : बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'चा जलवा! चार दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई
Jhimma 2 : 'झिम्मा 2' या सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने पाच कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Animal Advance Booking : रणबीरच्या 'ॲनिमल'चा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका; रिलीजआधीच केली कोट्यवधींची कमाई
Animal Advance Booking Day 1 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' या सिनेमा रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. Read More
Rohit Bal : फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
Rohit Bal : फॅशन डिझायनर रोहित बाल रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं समोर आलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.