![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashmika Mandanna: "हे भीतीदायक आहे, मी महिलांना आवाहन करू इच्छिते की..."; डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत बोलली रश्मिका
Rashmika Mandanna: रश्मिकानं डीपफेक व्हिडीओ आणि चित्रपटसृष्टीतून तिला मिळालेल्या पाठिंबा याबद्दल सांगितलं.
![Rashmika Mandanna: Rashmika Mandanna on deepfake video We have normalised them in animal promotional program Rashmika Mandanna:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/0775656f468cc522d3a00eea068e09311665220630084396_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) काही दिवसांपूर्वी डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) व्हायरल झाला. रश्मिकानंतर काजोल (Kajol) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे देखील डीपफेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. सध्या रश्मिका ही तिच्या अॅनिमल (Animal) या तिच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नुकत्याच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिकाला तिच्या डीपफेक व्हिडीओबाबत विचारण्यात आलं. यावेळी रश्मिकानं डीपफेक व्हिडीओ आणि चित्रपटसृष्टीतून तिला मिळालेल्या पाठिंबा याबद्दल सांगितलं.
काय म्हणाली रश्मिका?
प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिका म्हणाली, "डीपफेक व्हिडीओ काही काळापासून होत आहेत. अनेक लोकांना हे नॉर्मल केले आहे, परंतु ते ठीक नाही. हे भीतीदायक आहे. सर्व चित्रपटसृष्टीतील लोकांनी मला पाठिंबा दिला याचा मला आनंद आहे. याबद्दल बोलणे किती महत्त्वाचे आहे हे मला आता समजले आहे. मी महिलांना असे आवाहन करू इच्छिते की, हे नॉर्मल नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटत नाही त्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही आवश्यक ती मदत घ्यावी."
Rashmika About her Deepfake Video at Animal Press meet.#AnimalMovie #RashmikaMandanna pic.twitter.com/swa8QVOYvW
— Lok🧡 (@TeluguOchu) November 27, 2023
कलाकारांचा रश्मिकाला पाठिंबा
नागा चैतन्य, मृणाल ठाकूर आणि चिन्मयी श्रीपाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस अॅक्शन मोडमध्ये
रश्मिका मंदानाच्या डीपफेक एआय-जनरेटेड व्हिडिओच्या संदर्भात, आयपीसी, 1860 च्या 465 आणि 469 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 66C आणि 66E अंतर्गत पीएस स्पेशल सेल, दिल्ली पोलिस येथे एफआयआर नोंदवण्यात आला.
रश्मिकाचा आगामी चित्रपट
रश्मिका ही सध्या तिच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रश्मिकाशिवाय रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'अॅनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. 'अॅनिमल' या चित्रपटाला सेन्सॉरकडून म्हणजेच सीबीएफसीकडून 'A' प्रमाणपत्र मिळालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)