एक्स्प्लोर

Jami Gertz Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? सिनेमे फ्लॉप पण कोट्यवधींची मालकीण

Jami Gertz : अभिनेत्री जामी गर्ट्ज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

World Richest Actress : अभिनेत्रीपेक्षा अभिनेत्याला जास्त मानधन दिलं जातं, अशी चर्चा कायमच बॉलिवूडमध्ये (Bollywood) रंगत असते. कंगना रनौत (Kangana Ranaut) ते दीपिका पादुकोणपर्यंत (Deepika Padukone) अनेक अभिनेत्रींनी याप्रकरणावर भाष्य केलं आहे. पण आता बॉलिवूड असो वा हॉलिवूड सर्वच अभिनेत्री आपल्या सिनेमांच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतात. पण जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... तर जामी गर्ट्ज (Jami Gertz) जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

Jami Gertz Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री जामी गर्ट्ज! (World Richest Actress Jami Gertz)

जामी गर्ट्ज ही जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. संपत्तीच्या बाबतीत तिने एंजेलिना जोली, जेनिफर लॉरेंस, स्कारलेट जॉनस आणि चार्लीज थेरॉन अशा सर्वच कलाकारांना मागे टाकलं आहे. जामी गर्ट्जचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे कमी पडले आहेत. पण तरीदेखील जामीने चांगलीच कमाई केली आहे.जामी 80 च्या दशाकापासून मनोरंजनसृष्टीत अॅक्टिव्ह आहे. आजही तिने आपला अभिनयप्रवास सुरुच ठेवला आहे.

Jami Gertz Net Worth: बालकलाकार म्हणून सुरुवात...

जामी गर्ट्जने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली आहे. त्यावेळी ती जास्त कमाई करत नव्हती. पण आता मात्र ती चांगलीच कमाई करत आहे. जामीने 70 च्या दशकात मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी ती 'Different Strokes' नावाच्या एका कार्यक्रमात दिसली होती. तर 1981 मध्ये तिने 'एंडलेस लव' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. चार दशकांपेक्षा अधिक काळात जामीने अनेक सिनेमे आणि शो केले आहेत. 

World of Statistics च्या रिपोर्टनुसार, जामी गर्ट्ज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. जामीची एकूण संपत्ती तीन बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 25 हजार रोटी रुपये आहे. जामीचा पती टोनी रेसलर एक उद्योगपती आहे. जामी आणि टोनी 'NBA अटलांटा हॉक्स' या कंपनीचे मालक आहेत. तसेच त्यांचे अनेक छोटे-मोठे व्यवसायदेखील आहेत. जामी आणि टोनी 2010 मधील सर्वाधिक दान करणारे सेलिब्रिटी होते. 

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खान आहे. त्याची एकूण संपत्ती 6300 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 3000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची प्रॉपर्टी 2800 कोटी रुपये आहे. 

संबंधित बातम्या

Jhimma 2 : बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'चा जलवा! चार दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget