Telly Masala : प्रेक्षकांना आवडली तेजश्रीची 'प्रेमाची गोष्ट' ते अलका कुबल यांना 'माहेरची साडी' कसा मिळाला? जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Sep 2023 01:55 PM
Telly Masala : प्रेक्षकांना आवडली तेजश्रीची 'प्रेमाची गोष्ट' ते अलका कुबल यांना 'माहेरची साडी' कसा मिळाला? जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमातील पहिला फोटो समोर; थोड्याच वेळात अडकणार लग्नबंधनात
Parineeti Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या संगीत कार्यक्रमातील पहिला फोटो आता समोर आला आहे. Read More
Prathamesh Parab : बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी; प्रथमेश परबचं बाप्पाकडे मागणं
Kalavantancha Ganesh : अभिनेता प्रथमेश परबसाठी (Prathamesh Parab) गणपती बाप्पा खूप खास आहे. Read More
Bigg Boss 17 : 'या' दिवशी सुरू होणार 'बिग बॉस 17'; धमाकेदार प्रोमो आऊट
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा धमाकेदार प्रोमो आऊट झाला आहे. Read More
Maherchi Sadi : 'माहेरची साडी' पाहून आजही रडतात बायका; अलका कुबल यांना सिनेमा कसा मिळालेला? जाणून घ्या...
Maherchi Sadi : 'माहेरची साडी' हा ब्लॉकबस्टर सिनेमा 1991 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. Read More
Marathi Serials : प्रेक्षकांना आवडली तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट'! 'ठरलं तर मग' पडली मागे; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट...
Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. Read More
Rashmika Mandanna : गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि लाल साडी; 'Animal' सिनेमातील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक आऊट
Rashmika Mandanna First Look : 'अॅनिमल' या सिनेमातील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. Read More
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : आली समीप लग्नघटीका...चढली तोरणं, मांडव दारी; परिणीती-राघव आज अडकणार लग्नबंधनात
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघव आज लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.