Rajinikanth and Kamal Haasan: दोन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये! 21 वर्षानंतर रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकाच स्टुडिओमध्ये केलं चित्रपटांचे शूटिंग

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 23 Nov 2023 07:13 PM
Prakash Raj: अभिनेता प्रकाश राज यांना ईडीचं समन्स; नेमकं प्रकरण काय?
Prakash Raj: पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात. त्यामुळे आता प्रकाश राज यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. Read More
Rajinikanth and Kamal Haasan: दोन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये! 21 वर्षानंतर रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकाच स्टुडिओमध्ये केलं चित्रपटांचे शूटिंग
Rajinikanth and Kamal Haasan: नुकतेच कमल हासन आणि रजनीकांत  यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रजनीकांत आणि कमल हासन यांनी 21 वर्षानंतर एकाच स्टुडिओमध्ये शूटिंग केले आहे.  Read More
Animal Trailer out: जबरदस्त अॅक्शन आणि ड्रामा; रणबीरच्या 'अॅनिमल'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलच्या खतरनाक लूकनं वेधलं लक्ष
Animal Trailer out: अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील रणबीरच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Orry:"भाई तू नक्की काय काम करतो?"; अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी' नं अखेर सांगूनच टाकलं
Orry: ओरी हा सोशल मीडियावर विविध अभिनेत्रींसोबतचे फोटो शेअर करतो. अशातच गेल्या काही दिवसांपासून "ओरहान नक्की काय काम करतो?" हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता ओरीनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  Read More
IMDb List Of Most Popular Indian Stars: IMDb नं जाहीर केली 2023 मधील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी; दुसऱ्या क्रमांकावर आलिया, तिसऱ्या क्रमांकावर दीपिका, तर पहिल्या क्रमांकावर कोण?
IMDb List Of Most Popular Indian Stars: IMDb नं 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी  (IMDb List Of Most Popular Indian Stars) जाहीर केली आहे. Read More
Shah Rukh Khan: "भावा माझ्याकडे पैसे नाहीत"; नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुख खाननं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
Shah Rukh Khan: नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर AskSRK हे सेशन होस्ट केले. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली आहे.  Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.