Koffee With Karan 8: 'सारानं कोणाला डेट करावं?'; करण जोहरचा प्रश्न, अनन्या उत्तर देत म्हणाली, 'तिनं आता...'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 09 Nov 2023 09:09 PM
Mr And Mrs Mahi: जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Mr And Mrs Mahi: करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. Read More
Koffee With Karan 8: "सारानं कोणाला डेट करावं?"; करण जोहरचा प्रश्न, अनन्या उत्तर देत म्हणाली, "तिनं आता..."
Koffee With Karan 8: कॉफी विथ करण-8  या शोमध्ये करण जोहर हा सारा आणि अनन्याला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना सारा आणि अनन्यानं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Malaika Arora: "माझा बेबी बॉय आज 21 वर्षांचा झाला"; लेकाच्या वाढदिवसानिमित्त मलायकाची खास पोस्ट
Malaika Arora: आज मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहानचा वाढदिवस आहे.  तो 21 वर्षांचा झाला आहे. Read More
Kadak Singh Movie: "कहानियां कईं पर सच सिर्फ एक"; पंकज त्रिपाठींचा 'कडक सिंह' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरनं वेधलं लक्ष!
लवकरच पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह' (Kadak Singh) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. Read More
Video : "मला मराठी येते आणि मी..." ; आमिर खानच्या लेकीचा भन्नाट मराठी उखाणा!
Ira Khan And Nupur Shikhare: नुकतेच आयरानं तिच्या केळवण कार्यक्रमाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये आयरा ही खास उखाणा घेताना दिसत आहे. Read More
The Archies: मैत्री, प्रेम, रोमान्स आणि मतभेद; 'द आर्चीज' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; शाहरुखच्या लेकीच्या अभिनयानं वेधलं लक्ष!
The Archies Trailer Out: आर्चीज या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सुहाना खानच्या (Suhana Khan) अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Leo OTT Release : थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज! कधी अन् कुठे पाहता येणार सिनेमा?
Leo OTT Release : थलापती विजयचा (Vijay Thalapathy) 'लियो' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहू शकतात. Read More
Movies : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; सलमानच्या 'टायगर 3'ला टक्कर देणार 'हे' मराठी चित्रपट
Movies Diwali 2023 : दिवाळीत बिग बजेट बॉलिवूड सिनेमांसह मराठी सिनेमेदेखील प्रदर्शित होणार आहे. Read More
Koffee With Karan 8 : कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान; म्हणाली,"Permanent काही नसतं"
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात सारा अली खान (Sara Ali Khan) हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर साराने पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. Read More
Urfi Javed : उर्फी जावेद पोहोचली सुवर्ण मंदिरात; संस्कारी लूकने वेधलं लक्ष; पाहा फोटो
Urfi Javed : अटकेच्या प्रकरणानंतर उर्फी जावेद अमृतसरला गेली असून सुवर्ण मंदिराचं तिने दर्शन घेतलं आहे. Read More
Nawazuddin Siddiqui : "गोरा होण्यासाठी मी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो"; नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा
Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मोठा खुलासा केला आहे. गोरा होण्यासाठी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो, असं तो म्हणाला आहे. Read More
Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर धगधगती आग; 'सिंघम 3'मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट
Kareena Kapoor : 'सिंघम 3' (Singham 3) सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.