(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malaika Arora: "माझा बेबी बॉय आज 21 वर्षांचा झाला"; लेकाच्या वाढदिवसानिमित्त मलायकाची खास पोस्ट
Malaika Arora: आज मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहानचा वाढदिवस आहे. तो 21 वर्षांचा झाला आहे.
Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते आज मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहानचा वाढदिवस आहे. तो 21 वर्षांचा झाला आहे. लेकाच्या वाढदिवसानिमित्त मलायकानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मलायकानं खास पद्धतीन अरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मलायकाची पोस्ट
मलायकानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरहानचे बालपणीचे फोटो आहेत. या व्हिडीओला मलायकानं कॅप्शन दिलं, 'माझा बेबी बॉय आज 21 वर्षांचा झाला आहे. आयुष्य भरभरून जग. हसणे रडणे आवश्यक आहे. तू जितके कष्ट करतोस तितकेच तू खेळ. प्रामाणिक रहा .तुला आवडत असलेल्या लोकांसाठी आणि गोष्टींसाठी वेळ काढ. उत्तम स्वप्ने पहा . तुझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेव आणि आम्हा सर्वांना तुमच्या विचित्र विनोदाने हसव. तुला माहित आहे की, तू मला प्रिय आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड गोड मुला. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. मला तुझा खूप अभिमान आहे.'
View this post on Instagram
मलायकानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी अरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मलायकाने इन्स्टाग्रामावर अरहानसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते."
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. 2002 मध्ये अरहानला जन्म दिला. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए यांसारख्या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते. मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Malaika Arora: "ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ