Aamir Khan: 'एकाच फ्रेममध्ये दोन गजनी'; आमिर आणि सूर्याच्या फोटोनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 07 Nov 2023 06:39 PM
Sam Bahadur Trailer Out: नजर अशी की, दुश्मनाला थरकाप उडेल; सॅम माणेकशॉ यांची कथा मांडणार विकी, पाहा सॅम बहादुरचा जबरदस्त ट्रेलर
Sam Bahadur Trailer Out: सॅम बहादुर चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक फ्रेम आणि चित्रपटामधील डायलॉग्स हे लक्ष वेधतात. Read More
Aamir Khan: "एकाच फ्रेममध्ये दोन गजनी"; आमिर आणि सूर्याच्या फोटोनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष!
कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील आमिर खान (Aamir Khan) आणि सूर्याचा (Suriya) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More
First Rapper in India : यो यो हनी सिंह नव्हे 'हा' आहे भारताचा पहिला रॅपर; जीवे मारण्याच्या धमकीमुळे सोडलेला देश
Baba Sehgal : बाबा सहगल हा भारताचा पहिला रॅपर (First Rapper in India) आहे. पण काही कारणाने त्याला भारत सोडावा लागला होता. Read More
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनाही जडली रिल्सची सवय; म्हणाले,"दररोजचे दोन-तीन तास वाया जातात"
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन रिल्सच्या प्रेमात पडले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 15'च्या (Kaun Banega Crorepati 15) मंचावर त्यांनी खुलासा केला आहे. Read More
Rashmika Mandanna: माझ्या डीपनेकवर रश्मिकाचा चेहरा वापरला, 'त्या' फेक व्हिडीओवर झारा पटेल बोलली!
रश्मिकाच्या व्हायरल व्हिडीओचा ओरिजनल व्हिडीओ ज्या इन्फ्लुएंसरवर शूट झाला आहे, ती झारा पटेल पहिल्यांदाच या व्हिडीओबाबत बोलली आहे. झारा पटेलनं पोस्ट शेअर करुन डीपफेक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Kamal Haasan Birthday : दोन लग्न, पाच अफेअर..पण आजही सिंगल आयुष्य जगतात कलम हासन; जाणून घ्या अभिनेत्याच्या लव्ह लाईफबद्दल
Kamal Haasan : कमल हासन दोनदा लग्नबंधनात अडकले असून आजही ते सिंगल आयुष्य जगत आहेत. Read More
Tiger 3 Ruaan Song: अरिजित सिंहचा जादुई आवाज अन् प्रीतमचं संगीत; टायगर-3 मधील 'रुआं' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला
Tiger 3 Ruaan Song: टायगर- 3 (Tiger 3) या चित्रपटामधील  रुआं (Ruaan) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. Read More
Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ची रिलीज डेट ढककली पुढे; नेटकरी म्हणाले,"कतरिनाला घाबरला का?"
Yodha Movie Release Date : 'योद्धा' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. Read More
OTT Release This Week : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा धमाका; घरबसल्या ओटीटीवर पाहा 'हे' धमाकेदार सिनेमे अन् वेबसीरिज
OTT Release This Week : दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा धमाका मिळणार असून अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत. Read More
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'डंकी' सिनेमासाठी घेतलंय तगडं मानधन; जाणून घ्या तापसी पन्नू, बोमन ईरानी यांच्या मानधनाबद्दल
Shah Rukh Khan Dunki Fees : शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' या सिनेमासाठी चांगलच मानधन घेतलं आहे. Read More
Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Thug Life'चा टीझर आऊट! 36 वर्षांनी मणिरत्नमसोबत करणार काम
Kamal Haasan : कमल हासन यांच्या 'Thug Life' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. Read More
Ajinkya Deo : बाळासाहेब ठाकरेंची आज महाराष्ट्राला गरज होती : अजिंक्य देव
Ajinkya Deo : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), माहेरची साडी (Maherchi Sadi) ते आई-वडिलांचं हरवलेलं छत्र अशा अनेक विषयांवर अभिनेता अजिंक्य देवने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. Read More
Jhimma 2 : 'मराठी पोरी' दुनियेला दाखवती माज.. बाईपण जपणारं 'झिम्मा 2'मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; युट्यूबवरही ट्रे़डिंग
Jhimma 2 Song : 'झिम्मा 2' या सिनेमातील 'मराठी पोरी' हे पहिलं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.