OTT Release This Week : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा धमाका; घरबसल्या ओटीटीवर पाहा 'हे' धमाकेदार सिनेमे अन् वेबसीरिज
OTT Release This Week : दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा धमाका मिळणार असून अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत.
![OTT Release This Week : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा धमाका; घरबसल्या ओटीटीवर पाहा 'हे' धमाकेदार सिनेमे अन् वेबसीरिज OTT Release This Week Movies and web series zee5 amazon prime video abhishek bachchan mrunal thakur ishaan khatter Ghoomer Pippa Rainbow Rishta The Killer Zee5 Amazon Prime Video Netflix OTT Release This Week : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा धमाका; घरबसल्या ओटीटीवर पाहा 'हे' धमाकेदार सिनेमे अन् वेबसीरिज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/07/914e9f845d49eb790312619ac5c305ef1699332725428254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
OTT Release This Week : प्रेक्षकांसाठी यंदाची दिवाळी (Diwali 2023) खूप खास आहे. या दिवशीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा धमाका मिळणार आहे. अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. पण ओटीटी प्रेमींसाठी मात्र यंदाचा आठवडा खास नसणार आहे. एकीकडे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे अनेक चांगले सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमे आणि वेबसीरिजबद्दल जाणून घ्या...
घूमर (Ghoomer) :
कधी होणार रिलीज? 10 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? झी 5
अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा 10 नोव्हेंबर 2023 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात अभिषेक बच्चनसह सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात अभिषेकने क्रिकेट परिक्षकाची भूमिका साकारली आहे.
पिप्पा (Pippa)
कधी होणार रिलीज? 10 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
ईशान खट्टरचा (Ishaan Khattar) 'पिप्पा' हा सिनेमा आधी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण नंतर निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल. 'पिप्पा' या सिनेमाचं कथानक 1971 च्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. या सिनेमात ईशानसह मृणाल ठाकूर आणि प्रियांशू पेन्युली महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 10 नोव्हेंबरला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
रेनबो रिश्ता (Rainbow Rishta)
कधी होणार रिलीज? 7 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ
'रेनबो रिश्ता' ही आगामी वेबसीरिज 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जयदीप सरकारने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या सीरिजमध्ये त्रिनेत्रा दलधर, ऐश्वर्या आयुष्मान, डेनिएला मेंडोन्का, अनीज सैकिया, सनम चौधरी, सोहम सेनगुप्ता, सुरेश रामदास आणि सदम हंजाबम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
द किलर (The Killer)
कधी होणार रिलीज? 10 नोव्हेंहर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
डेविड फिंचरचा 'द किलर' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. एलेक्सिस नोलेंट यांनी या सीरिजचं लेखन केलं आहे. 'द किलर' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 10 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
Jawan OTT Release : शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना मनोरंजनाची 'ट्रीट'; 'जवान' ओटीटीवर रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)