Telly Masala : नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार 'हे' मराठी चित्रपट ते स्मिता शेवाळेने घेतली आलिशान कार; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Oct 2023 06:53 PM
Karachi To Noida Teaser: सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ चा टीझर रिलीज; डायलॉग्सनं वेधलं लक्ष
Karachi To Noida Teaser: ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Telly Masala : नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार 'हे' मराठी चित्रपट ते स्मिता शेवाळेने घेतली आलिशान कार; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Marathi Movies: सिनेप्रेमींसाठी नोव्हेंबर महिना असणार खास; 'हे' मराठी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi Movies: नोव्हेंबर महिन्यात काही मराठी चित्रपट (Marathi Movies) थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. Read More
Apurva Trailer: 'अपूर्वा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; तारा सुतारियाचा चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Apurva Trailer: तारा सुतारियाचा (Tara Sutaria) 'अपूर्वा' (Apurva) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत पोहोचली कंगना रनौत; रामलल्लाचे घेतले दर्शन, फोटो शेअर करत म्हणाली...
Ayodhya Ram Mandir: कंगनानं (Kangana Ranaut) अयोध्येतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More
Raveena Tandon Birthday: 'पत्थर के फूल' चित्रपटाचं 'पिझ्झा' सोबत आहे खास कनेक्शन; ‘अशी’ मिळाली होती रवीनाला चित्रपटात काम करण्याची संधी!
Raveena Tandon Birthday: रवीनाला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली? याबाबत जाणून घेऊयात...  Read More
Jhimma 2: 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत पण रिंकू राजगुरु..."; झिम्मा-2 चित्रपटाबाबत नेटकऱ्यानं केली कमेंट; सिद्धार्थ रिप्लाय देत म्हणाला...
नुकतीच एका नेटकऱ्यानं झिम्मा-2 (Jhimma 2) आणि रिंकू यांच्याबाबत एक कमेंट केली. या कमेंटला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Khalnayak Reunion Moment: माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ एकाच फ्रेममध्ये; नेटकरी म्हणाले, "खलनायक-2..."
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), संजय दत्त (Sanjay Dutt), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी  सुभाष घाई यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला हजेरी लावली. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.