Raveena Tandon Birthday: 'पत्थर के फूल' चित्रपटाचं 'पिझ्झा' सोबत आहे खास कनेक्शन; ‘अशी’ मिळाली होती रवीनाला चित्रपटात काम करण्याची संधी!
Raveena Tandon Birthday: रवीनाला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली? याबाबत जाणून घेऊयात...
Raveena Tandon Birthday: अभिनेत्री रवीना टंडनचा (Raveena Tandon) आज वाढदिवस आहे. रवीना ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रवीनानं 1991 मध्ये रिलीज झालेल्या पत्थर के फूल (Patthar Ke Phool) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रिन शेअर केली. या चित्रपटाचं आणि पिझ्झाचं खास कनेक्शन आहे. रवीनाला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली? याबाबत जाणून घेऊयात...
अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सोडलं शिक्षण
रवीनाच्या वडिलांचे नाव रवी आणि आईचे नाव वीणा टंडन आहे. रवीनाचे बालपण मुंबईतच गेले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जमुनाबाई पब्लिक स्कूलमध्ये झाले, तर त्यांनी मिठीभाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशनला सुरुवात केली, परंतु अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी रवीनानं दुसऱ्या वर्षातच शिक्षण सोडले. रवीनाने कॉलेजच्या दिवसांपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
'पत्थर के फूल' चं 'पिझ्झा' सोबत खास कनेक्शन
रवीना टंडनला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली जेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत एका रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा खात होती. रवीनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'मी माझ्या मित्रांसोबत पिझ्झा खाण्यासाठी एकारेस्टॉरंटमध्ये गेले होते. विवेक वासवानी आणि दिग्दर्शक अनंत बालानीही तिथे बसले होते, जे सलमान खानच्या पत्थर के फूल या चित्रपटात काम करण्याऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होते. अनंतने माझ्याकडे बोट दाखवल्यावर विवेक माझ्याशी बोलायला आला. मी विवेकला ओळखले कारण तो माझ्या भावाचा मित्र होता, पण त्याने मला ओळखले नाही. संवादादरम्यान मी माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मला माझा पहिला चित्रपट मिळाला.'
View this post on Instagram
रवीनानं या चित्रपटांमध्ये केलं काम
आतापर्यंत रवीनानं जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात दिलवाले, मोहरा, खिलाडी का खिलाडी, जिद्दी, बडे मियाँ छोटे मियाँ, आंटी नंबर 1 आणि परदेसी बाबू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. तिचे मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. नेटफ्लिक्सच्या अरण्यका या वेब सीरिजमधून रवीनानं ओटीटीमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर तिला काही दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या: