एक्स्प्लोर

Arshad Warsi: कल्कीमधील प्रभासला 'जोकर' म्हणत वाद ओढावला, आता स्त्री 2 मधल्या राजकुमारवर अर्शद वारसी म्हणाला

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला हिंदी चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अर्शदला चित्रपट आवडला की नाही.. यावर तो म्हणाला..

Arshad Warsi On Stree 2: नुकताच कल्की चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हणल्यानंतर चर्चेत आलेला बॉलिवूडचा अभिनेता अर्शद वारसी आता पुन्हा एकदा त्याच्या एका वक्तव्यानं चर्चेत आला आहे. नुकताच आलेला स्त्री2 हा चित्रपट आतापर्यंत पाहिलेला त्याचा शेवटचा चांगला चित्रपट असल्याचं अर्शद म्हणालाय.  मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनं आतापर्यंत आवडलेला शेवटचा चांगला चित्रपट कोणता यावर झटकन राजकुमार आणि श्रद्धाचा स्त्री 2 हा सिनेमा असल्याचं सांगितलं.

राजकुमार चांगला अभिनेता, पैशाचा चांगला उपयोग केला

अर्शदने आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांपैकी शेवटचा आवडलेला चित्रपट हा स्त्री 2 असल्याचं त्यानं सांगितलं. तो म्हणाला, मी स्त्री 2 पाहिला. मला तो खूप आवडला. मला राजकुमार राव खूप आवडला. तो चांगला अभिनेता आहे. जेंव्हा पैशाचा चांगला वापर होताना दिसतो तेंव्हा मला खूप आनंद होतो. जेंव्हा तुम्ही चित्रपटावर एवढे पैसे खर्च करता आणि त्यानंतर तो चित्रपट लोकांनाही आवडतो हे उल्लेखनीय असल्याचं त्यानं सांगितलं.

स्त्री 2 ने कमवला 600 कोटींचा गल्ला

स्त्री 2 चे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले असून यात श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत. राजकुमार राव प्रमुख भूमिकेत या चित्रपटात दिसतोय. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री'चा सिक्वेल आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला हिंदी चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय. रिलिजच्या 39 व्या दिवशी बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई करत हा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मनोरंजनसृष्टीतील कलाकारही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया देत असल्याचं दिसतंय. अर्शद वारसी याला आवडलेल्या चित्रपटांपैकी शेवटचा चांगला चित्रपट हा असल्याचं नुकतंच त्यानं सांगितलं.

प्रभासवर केलेल्या 'जोकर' कमेंटमुळे अर्शद चर्चेत

अलिकडेच आलेल्या कल्की 2898 या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेवर जोकर अशी प्रतिक्रीया दिल्यानंतर अर्शद वारसी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. हा चित्रपट पाहून तो निराश झाल्याचंही त्यानं सांगितलं होतंत .मी पाहणारा प्रत्येक चित्रपट मला आवडणारा असेल असे मी ठरवले होते. पण कल्की चित्रपटानं निराशा केल्याचं तो म्हणाला होता. आता त्यानंतर स्त्री 2 चित्रपट त्याच्या पसंतीस उतरला असून त्यानं त्यातील कलाकारांचंही भरभरून कौतूक केलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray:उद्धव ठाकरेंकडून भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्तावZero Hour Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंचा राजीनामा, विरोधकांचे आरोपांवर आरोपIND vs AUS Champions Trophy  : भारताची ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनी मात, 264 धावात गुंडाळलंABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
Embed widget