"इंदिरा गांधी आमच्यासाठी व्हिलन"; इमर्जन्सी चित्रपटाचा प्रीमियर पाहून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Kangana Ranaut Emergency Film : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, "आणीबाणीच्या काळात अनेक नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं, माझे वडीलही त्यावेळी तुरुंगात होते."
Devendra Fadnavis on Emergency Movie : आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आमच्यासाठी व्हिलन होत्या, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपटाचा प्रीमियर गुरुवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेर लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाबद्दल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रतिक्रिया दिली.
'इमर्जन्सी'च्या प्रीमियरला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी
इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रीमियरनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कंगना रणौतच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या टीमचं कौतुक आणि अभिनंदन केलं. त्यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहेत. फडणवीस यावेळी म्हणाले की, "इंदिरा गांधींनी देशासाठी चांगलं काम केलं. त्या देशाच्या नेत्या होत्या, पण आणीबाणीच्या काळात त्या आमच्यासाठी व्हिलन होत्या, असं फडवीसांनी म्हटलं आहे. प्रत्येक काळातील एक गोष्ट असते. मात्र, त्यांनीही देशासाठी खूप चांगलं काम केलं आहे".
इंदिरा गांधी आमच्यासाठी व्हिलन होत्या : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, जो इतिहास होता, तो इमर्जन्सी चित्रपटात मांडण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांच्या चांगल्या गोष्टी सुद्धा यामध्ये दाखवल्या आहेत. ऐतिहासिक घटनाचा मागोवा यामध्ये दिसतो. कंगना यांनी प्रभावीपणे अभिनय केला आहे. डॉ. बाबासाहोब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाला गुंडाळून त्यावेळी ठेवलं होतं, लोकांना जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. माझे वडीलसुद्धा त्यावेळी तुरुंगात होते. 1971 ची लढाई खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे. इंदिरा गांधी यांनी यांचा संपूर्ण जीवनप्रवास यामध्ये दाखवला गेला आहे.
सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याबाबतही प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले, "याप्रकरणी कारवाई सुरु आहे. पोलिसांनी तुम्हाला याबाबत सगळी माहिती दिली आहे. आरोपी कोणत्या हेतूने त्यांच्या घरात आरोपी घुसले होते, हे तुम्हाला कळलं असेल. पोलीस वेळोवेळी माहिती देत आहेत. मेगा सिटीमध्ये अशा प्रकारच्या घटना होत असतात. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असतो आणि भविष्यात अधिक कायदा सुव्यवस्था कडक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :