Ek Villain Returns Collection Day 1: 'एक व्हिलन रिटर्न्स' ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरूवात; पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन
जॉन अब्राहम (John Abraham), दिशा पाटनी (Disha Patani), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहा
Ek Villain Returns Collection Day 1 : गेल्या काही दिवसांपासून 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) चित्रपटाची स्टार कास्ट या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. जॉन अब्राहम (John Abraham), दिशा पाटनी (Disha Patani), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) या कलाकारांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. मोहित सूरीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. काल (29 जुलै) 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पाहूयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन....
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमधून 1.50 कोटींचे कलेक्शन केले होते. 27 जुलैपासून या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली होती. 2014 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाला होता. या पहिल्या पार्टनं ओपनिंग डेला 16.50 कोटींची कमाई केली होती. रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांनी 'एक व्हिलन' या चित्रपटामध्ये काम केलं होतं.
एक व्हिलन रिटर्न्स हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व स्टार्स खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. ग्रे कॅरेक्टर असणाऱ्या या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत नाहीये. पण चित्रपटांमधील गाण्यांना मात्र प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. किच्चा सुदीपच्या विक्रांत रोणा या चित्रपटासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे.
मोहित सूरीचे तीन चित्रपट ठरले फ्लॉप
'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या मोहित सुरीचे ‘मलंग’ (2020) , ‘हाफ गर्लफ्रेंड’(2017), ‘हमारी अधूरी कहानी’(2015) हे तीन चित्रपट फ्लॉप ठरले. आता जर ‘एक विलेन रिटर्न्स’ या त्याच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. तर मोहित सुरीच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाच्या नावाचा समावेश होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
हेही वाचा: