एक्स्प्लोर

Ek Villain Returns Box Office Collection 4 : ‘एक व्हिलन रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर संथच! चार दिवसांत कमावले अवघे इतके कोटी

Ek Villain Returns : 'एक व्हिलन' चित्रपटाचा सिक्वेल 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns ) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  

Ek Villain Returns : 'एक व्हिलन' चित्रपटाचा सिक्वेल 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns ) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या चित्रपटात जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पाटनी (Disha Patani) अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरु आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. चार दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 26.56 कोटींवर गेली आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ने चौथ्या दिवशी 3.02 कोटी रुपये इतके कलेक्शन केले आहे. 'एक व्हिलन रिटर्न्स'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.05 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.47 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.02 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत जवळपास 26.56 कोटींची कमाई केली आहे.

पाहा एकूण कलेक्शन :

‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट सुमारे 80 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. एक व्हिलन रिटर्न्सच्या स्टारकास्टमध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि दिशा पाटणी यांचा समावेश आहे. या चित्रपटाचा सीक्वल मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि टी-सीरीज व बालाजी टेलिफिल्म्सने निर्मिती केली आहे. 'एक व्हिलन' हा चित्रपट 27 जून 2014 रोजी प्रदर्शित झाला होता. रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांनी 'एक व्हिलन' या चित्रपटामध्ये काम केलं होतं. आता आठ वर्षांनंतर त्याचा हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बॉक्स ऑफिसवर कमाईत पडला मागे!

‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व स्टार्स खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. ग्रे कॅरेक्टर असणाऱ्या या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची हवी तितकी पसंती मिळत नाहीये. पण, चित्रपटांमधील गाण्यांना मात्र प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’ या चित्रपटासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट देखील सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मात्र, या चित्रपटासमोर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ काहीसा फिका पडला आहे.

हेही वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget