Dunki New Posters: "इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है"; शाहरुखने शेअर केलं डंकी चित्रपटाचं नवं पोस्टर
Dunki New Posters: किंग खानने डंकी या चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टर्सवरील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Dunki New Posters: Dunki New Posters features shah rukh khan vicky kaushal taapsee pannu Dunki New Posters:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/932caddb54ae542f084c97eadaf0eaaa1699100661837259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dunki New Posters: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित डंकी (Dunki) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. डंकी या चित्रपटाचा पहिला टीझर शाहरुखच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आला. आता किंग खानने डंकी या चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टर्सवरील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. डंकी चित्रपटाच्या पोस्टरला शाहरुखनं खास कॅप्शन दिलं आहे.
शाहरुखनं शेअर केलं पोस्टर
शाहरुख खानने सोशल मीडियावर डंकी चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. या पोस्टरवर शाहरुखसोबतच डंकी चित्रपटामधील इतर कलाकार देखील दिसत आहेत.शाहरुख खानने या पोस्टरला एक मजेदार कॅप्शन दिले आहे. शाहरुखनं डंकी या चित्रपटाला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "हम बिल्कुल उसी तरह दिख रहे हैं जैसे राजू सरने अपने अपने उल्लू के पट्ठों को इमेजिन किया था... इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है"
शाहरुखनं शेअर केलेल्या डंकी या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख हा डंकी या चित्रपटाच्या संपूर्ण क्रूसोबत दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये डंकी चित्रपटाचे कलाकार हे वाळवंटात दिसत आहे.
View this post on Instagram
डंकी चित्रपटाची कथा
डंकी या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे, जे इंग्लंडला जाण्याचे स्वप्न बघत असतात. या मित्रांची जबाबदारी हार्डीच्या म्हणजेच शाहरुख खानच्या खांद्यावर आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, दिया मिर्झा, धर्मेंद्र, बोमन इराणी, सतीश शाह महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
कधी रिलीज होणार चित्रपट?
'डंकी' हा बहुचर्चित चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. प्रभासचा सालार आणि शाहरुखचा डंकी या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे, असं म्हटलं जात आहे. राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी डंकी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
पठाण आणि जवान या चित्रपटानंतर शाहरुखचा डंकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Dunki Teaser Out : शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट; 'डंकी'चा धमाकेदार टीझर आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)