VIDEO: दुबईत किंग खानच्या 'डंकी'ची क्रेझ; ड्रोन शो अन् बुर्झ खलिफावर चित्रपटाचा ट्रेलरही झळकला!
Dunki Trailer: दुबईमधील (Dubai) बुर्ज खलिफा (Burj Khalifa) येथे डंकी या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. तसेच बुर्ज खलिफा जवळ एक ड्रोन शोचं देखील आयोजन करण्यात आलं.
Dunki Trailer: शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या डंकी (Dunki) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. किंग खाननं (Shah Rukh Khan) डंकी (Dubai) या चित्रपटाचं दुबई येथे देखील प्रमोशन केलं. दुबईमधील बुर्ज खलिफा (Burj Khalifa) येथे डंकी या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. तसेच बुर्ज खलिफाजवळ एक ड्रोन शोचं देखील आयोजन करण्यात आलं. या ड्रोन शोमध्ये लाइट्सच्या मदतीनं शाहरुखची आयकॉनिक पोज देखील तयार करण्यात आली.
पूजा ददलानीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा ड्रॉन शो बघताना दिसत आहे. या व्हिडीओला पूजानं कॅप्शन दिलं, "डंकी आणि शाहरुख खान हे आकाश उजळवत आहेत!!! बुर्ज खलिफाजवळ पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा आणि अर्थातच एक अतिशय खास व्यक्ती आणि अत्यंत खास चित्रपट साजरा करण्यासाठी आयोजित केलेला एक अद्भुत ड्रोन शो! भेटूया 21 डिसेंबरला थिएटरमध्ये!"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
बुर्ज खलिफावर झळकला 'डंकी'चा ट्रेलर (Dunki Trailer On Burj Khalifa)
बुर्ज खलिफावर शाहरुखच्या डंकी या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. बुर्ज खलिफावर हा ट्रेलर पाहण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी गर्दी केली.
View this post on Instagram
'डंकी' ची रिलीज डेट
'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी यांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटात शाहरुख आणि तापसी यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
'लुट-पुट गया', 'निकले दी कभी हम घर से' आणि 'ओ माही' ही डंकी या चित्रपटाची गाणी रिलीज झाली आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बंदा हे गाणं देखील रिलीज झालं. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या:
VIDEO : दुबईतील डंकीच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये किंग खान 'छैय्या छैय्या' गाण्यावर पुन्हा एकदा थिरकला