Dunki Drop 5: किंग खान आणि तापसीचा रोमँटिक अंदाज; डंकी चित्रपटातील 'ओ माही' गाणं रिलीज
डंकी (Dunki) या चित्रपटातील 'ओ माही' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात तापसी पन्नू आणि शाहरुख खान यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Dunki Drop 5: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील 'ओ माही' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात तापसी पन्नू (Tapsee Pannu) आणि शाहरुख खान यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
हार्डी आणि मनूचा रोमँटिक अंदाज (O Maahi Song Out)
डंकी या चित्रपटातील 'ओ माही' या गाण्यामध्ये हार्डी आणि मनू म्हणजेच शाहरुख आणि तापसी यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. 'ओ माही' हे गाणे अरिजीत सिंहनं गायलं आहे. तर प्रीतमनं या गाण्याला संगीत दिलं आहे. इरशाद कामिल हे या गाण्याचे गीतकार आहेत. गाण्यात हार्डी आणि मनू यांच्यातील प्रेम दिसत आहे.
पाहा 'ओ माही' गाणे-
काही दिवसांपूर्वी डंकी या चित्रपटामधील लूट पूट गया हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात देखील हार्डी आणि मनू यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. अनेक नेटकऱ्यांनी या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले. अशातच आता डंकी चित्रपटातील 'ओ माही' या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
कधी रिलीज होणार डंकी? (Dunki Release Date)
बोमन ईरानी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर यांनी देखील डंकी या चित्रपट काम केलं आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख हा त्याच्या चाहत्यांच्या 2023 या वर्षाचा शेवट मनोरंजनानं करणार आहे. आता डंकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
डंकी म्हणजे काय?
शाहरुखनं 'ओ माही' या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर करुन डंकीचा अर्थ चाहत्यांना सांगितला होता. त्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं होतं, "सगळे विचारत आहेत, म्हणून सांगतो. डंकीचा अर्थ आपल्या लोकांपासून दूर राहणे."
View this post on Instagram
संबंधित बातम्या:
Dunki Drop 5 : शाहरुखने दाखवली 'ओ माही' गाण्याची झलक; 'डंकी'चा खरा अर्थही सांगितला