Alia Bhatt On Trolling : "मी आवडत नसेल तर माझे सिनेमे पाहू नका"; स्टार किडला ट्रोल करणाऱ्यांना आलिया भट्टचं सडेतोड उत्तर
Alia Bhatt : आलिया भट्ट स्टार किड असल्याने तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. पण आता तिने या गोष्टीवर भाष्य केलं आहे.
Alia Bhatt On Trolling : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे तसेच प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. आलियाने नावापुढे कपूर आडनाव लावल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आलियाला तिच्या कामामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता "मी आवडत नसेल तर माझे सिनेमे पाहू नका" असं म्हणत आलियाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
स्टार किडला अनेकदा ट्रोल करण्यात येत असते. करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' या सिनेमाच्या माध्यमातून आलियाने 2012 साली सिनेसृष्टीत पदार्णण केलं. आलिया पहिल्याच सिनेमात मुख्य भूमिकेत असल्याने तिला ट्रोल करण्यात आले. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया म्हणाली,"माझे आई-वडील सिनेसृष्टीत काम करतात यात माझी काय चूक. उद्या जर कोणत्या अभिनेत्याच्या, अभिनेत्रीच्या मुलांना सिनेसृष्टीत पदार्पण करायचं असेल तर त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल".
View this post on Instagram
रणबीर-आलियाचा पहिला सिनेमा
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून चाहतेही खूप उत्सुक आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच आलिया भट्टचा चित्रपट ‘डार्लिंग्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आता रणबीर आणि आलियाचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ पुढच्या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या दोघांचा एकत्र असा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरूनच दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.
नुकताच रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. आता अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रणबीरसाठी लकी ठरेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, चैतन्य अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या