Don 3: डॉन-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस? फरहान अख्तरनं नव्या चित्रपटाची घोषणा करताच भडकले नेटकरी, 'हे' आहे कारण
फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Don 3: शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डॉन 2 (Don 2) चित्रपटानंतर प्रेक्षक डॉन 3 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते.नुकताच फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डॉन-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
फरहान अख्तरने शेअर केला व्हिडीओ
फरहान अख्तरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तीन हा आकडा दिसत A NEW ERA BEGINS असं लिहिलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी असा अंदाज लावत आहेत की, फरहाननं डॉन-3 या चित्रपटाची घोषणा केली आहे. डॉन-3 या चित्रपटामध्ये शाहरुख खानला रणवीर सिंह रिप्लेस करणार आहे, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता फरहान अख्तरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच नेटकरी त्याच्यावर भडकले आहेत.
'या' कारणामुळे भडकले नेटकरी
फरहाननं शेअर केलेल्या व्हिडीओवर खूप लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. डॉन-3 मध्ये रणवीर सिंह हा शाहरुखला रिप्लेस करणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु असल्यानं नेटकरी फरहानवर भडकले आहे. शाहरुख खानशिवाय डॉन 3 हा चित्रपट होऊ शकत नाही, असे नेटकऱ्यांचे मत आहे. एका नेटकऱ्यानं फरहाननं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, 'थोडी लाज बाळगा, शाहरुखसोबत हा चित्रपट का केला नाही? तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली - 'नो एसआरके नो डॉन.'
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, डॉन 3 मध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार असल्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. डॉन 3 चे निर्माते गदर 2 आणि OMG 2 च्या रिलीजसह डॉन 3 चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याचा विचार करत आहेत.
2006 साली डॉन चित्रपटाचा पहिला रिमेक प्रदर्शित झाला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. पाच वर्षांनंतर 2011 मध्ये डॉन 2 रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. हे दोन्ही चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते.
संबंधित बातम्या
Don 3 : 'डॉन 3'मध्ये शाहरुख खानची जागा घेणार Ranveer Singh; निर्माते लवकरच करणार अधिकृत घोषणा