एक्स्प्लोर
तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला
अनन्याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर फराह खानने अजब कमेंट केली.
![तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला Do A Dna Test Farah Khan Suggest To Chunky Pandeys Daughter Ananya Pandey तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22071652/Chunky_Ananya_Farah.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आपल्या बिनधास्त अंदाजासाठी चर्चेत असते. सध्या ती अभिनेता चंकी पांडेच्या मुलीवर केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आहे.
इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर अनेक स्टार किड्स आपला जलवा दाखवत असतात. चर्चेत कसं राहायचं हे त्यांना व्यवस्थित माहित आहे. नव्या नवेली, सुहाना खान, जान्हवी या स्टार किड्सच्या यादीत आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेही सामील झाली आहे. अनन्या इन्स्टाग्रामवर फारच अॅक्टिव्ह असते.
अनन्याची आई भावना पांडेने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर फराह खानने अजब कमेंट केली. फराहने लिहिलं आहे की, "तू तुझी डीएनए टेस्ट कर प्लीज....चंकीची मुलगी असूनही ती फार सुंदर आहे."
अर्थात फराहची कमेंट थट्टेतच केली. तिला चंकी पांडेच्या मुलीच्या सौंदर्याची भुरळ पडल्याचं स्पष्ट जाणवतंच आणि ती अनन्याचं कौतुकच करत आहे.
चंकी आणि फराह यांची जुनी मैत्री असून सुरुवातीला दोघांनी अनेक सिनेमात एकत्र कामही केलं आहे.
![Ananya_Instagram](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22124620/Ananya_Instagram.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)