एक्स्प्लोर

Digpal Lanjekar: "नवे क्षितीज … नवे सीमोल्लंघन"; दिग्पाल लांजेकरांनी केली 'मुक्ताई' चित्रपटाची घोषणा

Digpal Lanjekar : दिग्पाल यांनी नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'मुक्ताई' असं आहे.

Digpal Lanjekar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या 'सुभेदार' (Subhedar)  या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सुभेदार चित्रपटानंतर दिग्पाल यांचा  ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava)  या चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता दिग्पाल यांनी नुकतीच त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'मुक्ताई' असं आहे. एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन दिग्पाल यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केला व्हिडीओ

दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विठूरायाची मूर्ती दिसत आहे. या व्हिडीओला दिग्पाल यांनी कॅप्शन दिलं, "नवे क्षितीज …. नवे सीमोल्लंघन… कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई. तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा !". 'मुक्ताई'  या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल हे श्री संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहेत.

दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी दिग्पाल यांच्या या आगामी चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

कधी रिलीज होणार मुक्ताई चित्रपट?

मुक्ताई या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट जून 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

दिग्पाल लांजेकर यांचे चित्रपट

'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar)  या दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या मुक्ताई  आणि  ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava)  या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा' हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमकूळ घातला. सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी  तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली.

संबंधित बातम्या:

Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget