(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Katrina Vicky Wedding Dress : कतरिनाच्या प्री-वेडिंग साडीसाठी लागले तब्बल 1800 तास, 40 कामगारांनी केली मेहनत
Katrina Kaif Wedding Sari : कतरिना कैफ आणि विकी कौशलने त्यांच्या लग्नाआधीचे फोटो शेअर केले आहेत.
Katrina Vicky Wedding Dress : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघे 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कतरिना आणि विकीच्या लग्नातील फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram
दोघेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नसोहळ्यातले फोटो शेअर करत आहेत. नुकतेच कतरिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या प्री-वेडिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. कतरिना कैफने प्री-वेडिंगमध्ये नेसलेली साडी बनवण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. कतरिना कैफ फॅशनच्या बाबतीत आघाडीवर आहे. कतरिनाने नेसलेली साडी डिझाइन करण्यासाठी 1800 तास आणि 40 कारागीर लागले होते.
View this post on Instagram
कतरिनाने तिला लूक डायमंडच्या चोकर नेकपीस आणि मॅचिंग कानातल्यांनी पूर्ण केला आहे. नुकतेच कतरिना आणि विकी मुंबईत परतले आहेत. दोघेही विमानतळावर स्पॉट झाले. कतरिनाने हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. भारतीय लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान विकी कौशल फॉर्मल लूकमध्ये दिसला.
संबंधित बातम्या
Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : राजेशाही थाटात पार पडला अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा
Katrina Kaif and Vicky Kaushal : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात, आता लवकरच कतरिनाची जाऊबाई होणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha