Katrina Kaif and Vicky Kaushal : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात, आता लवकरच कतरिनाची जाऊबाई होणार?
Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमधील एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधले.
Katrina Kaif and Vicky Kaushal : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कतरिना आणि विकीने त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ (Sharvari Wagh). शर्वरी आणि विकीचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) या दोघांच्या अफेअरबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
एका रिपोर्टनुसार, विकीचा भाऊ सनी आणि शर्वरी एकमेकांना डेट करत आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या मेहंदी सोहळ्याच्या फोटोमुळे शर्वरी आणि सनी यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू झाली.
कोण आहे शर्वरी वाघ
शर्वरीचा जन्म 14 जून 1996 मध्ये मुंबईमध्ये झाला. ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. रूपारेल कॉलेजमध्ये शर्वरीने शिक्षण घेतलं.
View this post on Instagram
बंटी और बबली-2 मधून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण
बंटी और बबली 2 या चित्रपटामधून शर्वरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटामध्ये शर्वरीसोबत पंकज त्रिपाठी, सिद्धांत चतुर्वेदी ,सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील शर्वरी आणि सिद्धांतच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
संबंधित बातम्या
Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी?