हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Kolkata Fire: आगीवेळी हॉटेलमधील बहुतेक रहिवासी झोपलेले होते. इमारतीत धूर पसरल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.

Kolkata Fire: कोलकातामधील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका पाच मजली इमारतीला आग लागली. या इमारतीत अनेक हॉटेल्स होती. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका चार वर्षांच्या मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला. सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले. इतर सहा जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत 80 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. आगीवेळी हॉटेलमधील बहुतेक रहिवासी झोपलेले होते. इमारतीत धूर पसरल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या मते, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आगीची माहिती मिळताच पाच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. दाट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यास अडचण येत होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, परंतु इमारत अजूनही अत्यंत गरम असल्याने, कुलिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आतली व्यवस्था पाहून मला धक्का बसला
घटनास्थळाला भेट दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे अग्निशमन विभागाचे मंत्री कौशिक चौधरी यांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे, परंतु फॉरेन्सिक तपासणीनंतर याची पुष्टी होईल. मंत्र्यांनी सांगितले की, इमारतीमधील परिस्थिती अत्यंत वाईट होती आणि तिथे अनेक हॉटेल्स कार्यरत होती. तेथील परिस्थिती पाहून आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्र्यांच्या मते, इमारत व्यवस्थापनाने मूलभूत सुरक्षा आणि बांधकाम नियमांचे पालन केले नव्हते. हॉटेलच्या कामकाजात विविध अनियमिततांच्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी घटनास्थळाला भेट देऊ शकतात.
इमारतीचा मालक फरार, गुन्हा दाखल होणार
पोलिसांच्या माहितीनुसार, इमारतीचा मालक सध्या फरार आहे. न्यू मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस मालकाचा त्याच्या घरासह अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. आगीचे कारण आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी सुरू आहे.
बीरभूम हॉटेलमधील आगीत नऊ जणांचा मृत्यू
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिराजवळील एका हॉटेलला आग लागली. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















