Dhumshaan Ghala Re: मराठी चित्रपटात मालवणी भाषेतील गाणं; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल नृत्य!
Dhumshaan Ghala Re Song: एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला 'प्रेमप्रथा धुमशान' (Prem Pratha Dhumshaan) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
Dhumshaan Ghala Re Song: एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला 'प्रेमप्रथा धुमशान' (Prem Pratha Dhumshaan) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातलं ‘धुमशान घाला रे’ (Dhumshaan Ghala Re) हे धमाल मालवणी गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, येत्या 28 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘धुमशान घाला रे’ (Dhumshaan Ghala Re) हे मालवणी बोली भाषेतील गाणं आहे. धमाल शब्द आणि ताल धरायला लावणारं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मालवणी गाणी फारच मोजकी असल्यानं या नव्या धमाल गाण्याची आता त्यात भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका अत्यंत वेगळ्या प्रथेवर या चित्रपटातील कथा बेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच चर्चा आहे. मात्र, आता ‘धुमशान घाला रे’ हे गाणं मालवणी माणसांसह समस्त चित्रपटप्रेमींना ताल धरायला लावणारं आहे.
पाहा गाणं :
'प्रेम प्रथा धुमशान' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिजित वारंग सांभाळणार आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' या चित्रपटाच्या माध्यमातून मालवणी बोलीत एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता.
'प्रेमप्रथा धुमशान'चाही विषय असणार हटके!
ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेमप्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत.
चित्रपटही मालवणी भाषेत!
'पिकासो'प्रमाणेच 'प्रेमप्रथा धुमशान' हा चित्रपटही मालवणी बोलीभाषेतलाच आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबसह (Shivali Parab) विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, गीत संजय वारंग, आनंद लुंकड यांचे संगीत दिग्दर्शन आणि विवेक नाईक यांच्या दमदार आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.
हेही वाचा :
Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब झळकणार 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमात; टीझर आऊट