(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nutan, Sanjeev Kumar : हातातल्या मासिकात बातमी वाचली अन् संतापलेल्या नूतन यांनी संजीव कुमारांना थप्पड लगावली! वाचा किस्सा..
Nutan, Sanjeev Kumar : बॉलिवूडमध्ये चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात अफेअर असणे सामान्य गोष्ट आहे. एखादा चित्रपट संपल्यावर अनेक नाती पुढे सरकतात, तर अनेक तुटतात.
Nutan, Sanjeev Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नूतन (Nutan) आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. ‘मिस इंडिया’चा किताब जिंकणाऱ्या नूतन या पहिल्या अभिनेत्री होत्या. नूतन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले आहे. यासोबतच त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्सेही चर्चेत होते. अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांच्याशी संबंधित एक किस्सा देखील सर्वश्रुत आहे.
बॉलिवूडमध्ये चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात अफेअर असणे सामान्य गोष्ट आहे. एखादा चित्रपट संपल्यावर अनेक नाती पुढे सरकतात, तर अनेक तुटतात. चित्रपटसृष्टीत नावं एकमेकांशी जोडणं आणि चर्चा होणं या गोष्टी नेहमीच घडत असतं. पण, या अफेअरच्या चर्चा जुन्या काळातील अभिनेते संजीव कुमार यांच्याबाबतीत खूप होत्या. याच गोष्टीमुळे त्यांना अभिनेत्री नूतन यांच्याकडून थप्पड खावी लागली होती.
मैत्रीला लागलं अफेअरचं नाव
1969मध्ये अभिनेत्री नूतन आणि अभिनेते संजीव कुमार ‘देवी’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. नूतन या चित्रपटाच्या सेटवर नेहमी एकट्याच बसलेल्या असायच्या आणि कोणाशी जास्त बोलतही नव्हत्या. पण, हळूहळू त्यांचा संकोच दूर झाल्यावर, त्यांची को-स्टार संजीव कुमार यांच्याशी मैत्री झाली. जेव्हा, संजीव आणि नूतन यांची मैत्री वाढली, तेव्हा त्यांच्या अफेअरच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. मैत्रीला अफेअरचं नाव लावणं, हे पाहून नूतन संतापल्या होत्या.
एके दिवशी, शूटमधून मोकळा वेळ मिळाला असता, नूतन सेटवरच एक मासिक वाचत बसल्या होत्या. या मासिकामध्ये त्यांच्या आणि संजीव यांच्या नात्याबद्दल लिहिले होते. तशा नूतन खूप शांत आणि कोमल स्वभावाच्या होत्या, पण ही बातमी वाचून त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत.
तरीही चर्चा थांबल्या नाहीत!
याच रागाच्या भरात नूतन थेट संजीवकडे गेल्या आणि त्यांना थेट थप्पड लगावली होती. सेटवर उपस्थित असलेले अनेक लोक या घटनेचे प्रत्यक्षदर्शी झाले. यानंतरही बातम्यांची लाट थांबली नाही. पती राजेश बहल यांच्या सांगण्यावरून नूतनने संजीवला धडा शिकवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नूतन आणि त्यांच्या पतीला असा संशय होता की, संजीव कुमार यांनीच अफेअरच्या बातम्या पसरवल्या होत्या.
हेही वाचा :
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!