एक्स्प्लोर

रणवीर नाही, रणबीर कपूरसोबतचा फोटो दीपिकाकडून शेअर

जागातिक छायाचित्रण दिवसाच्या निमित्ताने दीपिकाने इन्स्टाग्रामवर 'तमाशा' चित्रपटाच्या शूटिंगवेळचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र दीपिकाने नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांना बुचकळ्यात टाकत आहे. कारण दीपिकाने रणवीर सिंगचा नाही, तर अभिनेता रणबीर कपूरचा फोटो शेअर केला आहे. जागातिक छायाचित्रण दिवसाच्या निमित्ताने दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे 'तमाशा' चित्रपटाच्या शूटिंगवेळचा. कोर्सिकामध्ये शूट केलेल्या या फोटोमध्ये रणबीर पोझ देताना दिसतो, तर दीपिका त्याचा फोटो क्लिक करत आहे. दीपिका आणि रणबीर काही वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र रणबीरच्या वर्तणुकीमुळे दीपिकाने त्याच्यापासून फारकत घेतल्याचं म्हटलं जातं. खरंतर ब्रेकअपनंतरच त्यांनी 'तमाशा' या सिनेमाचं शूटिंगही केलं. मात्र सध्या दोघंही नव्या नात्यात गुंतलेले असताना दीपिकाने आपल्या 'एक्स'सोबत फोटो पोस्ट करणं काहीसं आश्चर्यकारक आहे. तमाशापूर्वी दीपिका आणि रणबीर यांनी 'बचना ऐ हसीनों' आणि 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. 2007 मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची भेट झाली होती. 2008 साली 'बचना ऐ हसिनो'च्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र एके दिवशी दीपिकाने बॉयफ्रेण्डला एका तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं आणि नात्याची घडी विस्कटली. दीपिकासोबत ब्रेकअपनंतर रणबीर आणि कतरिना कैफ यांचं सूत जुळलं. मात्र काही महिन्यातच दोघांनीही एकमेकांना अलविदा केला. सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट डेट करत आहेत. तर दीपिका आणि रणवीर सिंग 20 नोव्हेंबरला लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Capturing Moments ???????? #WorldPhotographyDay

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget