(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gehraiyaan : ...अशा प्रकारे झालं इंटिमेट सिन्सचं शूटिंग; दीपिकानं सांगितला अनुभव
Gehraiyaan चित्रपटाच्या ट्रेलरमधील सिद्धांत आणि दीपिका यांच्या इंटिमेट सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले.
Gehraiyaan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपीका पादुकोणचा (Deepika padukone) 'गेहरांईया' या चित्रपट प्रेक्षकांचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. चित्रपटात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi) आणि अन्नया पांडे (Ananya Pandey) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'गेहरांईया' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील सिद्धांत आणि दीपिका यांच्या इंटिमेट सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले. हे सिन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल दीपिकानं सांगितला.
'चित्रपटात दाखण्यात आलेले इंटिमेट सिन्स हे अगदी सहजपणे सादर करता आले, कारण या चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्रा हे शूटिंग सुरू असलेल्या सेटवर वेगळं वातावरण निर्माण करत होते. त्यामुळे सिन शूट करायला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही', असं दीपिकानं सांगितलं. चित्रपटातील इंटिमेट सिन्सचे दिग्दर्शन Dar Gai यांनी केले आहे.
View this post on Instagram
11 फेब्रुवारी 2022 रोजी भारतातील, तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर हा चित्रपट पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या
MS Dhoni Novel Atharva The Origin : धोनीची नवी इनिंग; ग्राफिक नॉवेलचा फर्स्ट लूक रिलीज
Gehraiyaan ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अनन्यानं स्वत:ला बाथरूममध्ये केलं लॉक; सांगितलं हे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha