(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepika Padukone : दीपिका पदुकोण बनली 'विश्वसुंदरी', जगातील सौंदर्यवान महिलांच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय, टॉप 10 मध्ये 'या' क्रमांकावर
Top 10 Most Beautiful Women in The World : बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण हिने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहं.
Worlds Most Beautiful Women List : बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोण हिने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जगातील सौंदर्यवान महिलांच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यादीत स्थान मिळवणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय महिला आहे. या नवीन रेकॉर्डसह दीपिका पदुकोणने प्रियंका चोप्रा, आलिया भट, श्रद्धा कपूर यांसारख्या स्टार अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. लंडनमधील कॉस्मेटिक सर्जन जुलियन डी सिल्वा यांनी तयार केलेल्या जगातील सौंदर्यवान अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणचं नाव समाविष्ट आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावावर नवा विक्रम
जगातील सौंदर्यवान महिलांच्या यादीत अनेक इंटरनॅशनल स्टार अभिनेत्री सामील आहेत. हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिकांसह अनेक प्रसिद्ध इंटरनॅशनल आयकॉन यांचा या यादीत समावेश आहे. दीपिकाचा या यादीत समावेश असून तिला 91.22 टक्के गुण देण्यात आले आहेत. या यादीत हॉलिवूड अभिनेत्री झेंडाया, बियॉन्स, किम कारदिशीयन, टेलर स्विफ्ट आणि अरियाना ग्रांडे यांच्या नावाचाही समावेश आहे.
दीपिका पदुकोण बनली 'विश्वसुंदरी'
हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झेंडया हिने 94.37 टक्के गुणांसह या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. बेला हदीद 94.35 टक्के गुणांसह यादीत तिसऱ्या नंबरवर आहे, तर क्वीन बी म्हणजेच बियॉन्से यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, तिला 92.44 टक्के गुण देण्यात आले आहेत. टीव्ही स्टार किम कार्दशियनने या यादीत 8 व्या स्थानावर आहे, तर टेलर स्विफ्ट 6 व्या क्रमांकावर आहे. एरियाना ग्रांडेने 91.81 टक्के गुणांसह 5 व्या स्थानावर आहे.
जगातील सौंदर्यवान महिलांच्या यादीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय
View this post on Instagram
पहिल्या क्रमांकावर कोण?
जगातील सर्वाधिक सुंदर टॉप 10 महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर किलिंग इव्ह स्टार जोडी कॉमर आहे. जोडीने 94.52 टक्के गुणांसह जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब पटकावला आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या चिमुकलीच्या संगोपनासाठी वेळ देत मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिका पदुकोण आगामी सिंघम अगेन चित्रपटात रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यासह स्क्रिन शेअर करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :