Daagdi Chawl 2: यंदाची दिवाळी ठरणार फिल्मी दिवाळी; घरबसल्या अनुभवता येणार ‘दगडी चाळ 2’चा थरार! जाणून घ्या वेळ आणि दिवस..
Daagdi Chawl 2: मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांनी ‘दगडी चाळ 2’मध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत.
Daagdi Chawl 2: पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपट जवळपास 1 कोटी 25 लाख प्रेक्षकांनी पाहिला. ‘पावनखिंड’, ‘झिम्मा’, ‘चंद्रमुखी’, ‘कारखानिसांची वारी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरनंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट अर्थातच ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chawl 2). या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
आता हा सुपरहिट चित्रपट घरबसल्या म्हणजेच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या धामधुमीत म्हणजेच 30 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर ‘दगडी चाळ 2’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
घरबसल्या पाहता येणार ‘दगडी चाळ 2’
‘चुकीला माफी नाही’, असं ठणकावून सांगणारे डॅडी, डॅशिंग सूर्या आणि धीरगंभीर सोनल हे त्रिकुट साकारणारे कलाकार अर्थातच मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांनी ‘दगडी चाळ 2’मध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. चंद्रकांत कणसे यांनीच ‘दगडी चाळ 2’चं ही दिग्दर्शन केलं आहे. 'दगडी चाळ' हा चित्रपट 2015मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर प्रेक्षक 'दगडी चाळ 2'ची आतुरतेने वाट पाहत होते. तब्बल सात वर्ष प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्याही प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट करत प्रेक्षकांनी या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिला आहे.
‘डॅडी’ आणि ‘सूर्या’च्या नात्यात पडलेली ठिणगी!
‘डॅडी’ आणि ‘सूर्या’चे नाते आपण याआधीच पाहिले होते. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला. त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. मात्र, यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ 2' पाहिल्यावरच मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत. तर, अभिनेता अंकुश चौधरी ‘सूर्या’च्या भूमिकेत झळकले आहेत.
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या 'दगडी चाळ'मधील 'चुकीला माफी नाही', असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे.
हेही वाचा :