Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Veteran Actress Asha Singh: ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

Asha Singh Passes Away: सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आशा सिंह (Asha Singh) यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी (22 ऑगस्ट 2026) त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, फुफ्फुसाच्या (Lung Disease) संसर्गाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर आशा सिंह यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. गेल्या तीन महिन्यांपासून (Entertainment) त्या या आजाराशी झुंज देत होते. दरम्यान, अभिनेत्रीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. सध्या सिने सृष्टीतील कलाकारांकडून श्रध्दांजली वाहिली जात आहे.
आशा सिंह यांचं शुक्रवारी झालं निधन (Veteran Actress Asha Singh Passes Away)
भारतीय सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा म्हणजे आशा सिंह. त्यांनी अनेक दशकं आपल्या सुंदर अभिनयातून गाजवली. सिनेमा तसेच टेलिव्हिजन जगतात त्यांनी विविध प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन आपली एक वेगळी छाप प्रेक्षकांमध्ये सोडली. त्यांचे सिनेसृष्टीसाठी असलेले योगदान खूप मोठे होते. त्यांच्या अचानक निधनानंतर सिंह कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
1970 च्या दशकापासून सिने इंडस्ट्रीत सक्रीय असलेल्या आशा सिंह यांनी एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्वत:ला स्थापित केलं. आपल्या प्रदीर्घ काळात त्यांनी असंख्य सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं. आशा सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारली. प्रसारमाध्यमांनुसार, आशा सिंह यांना बी. आर चोप्रा यांच्या प्रसिद्ध टीव्ही शो 'महाभारत' या मालिकेत त्यांनी 'कृपी' यांची भूमिका साकारली होती. सिनेसृष्टीत त्यांचा प्रभाव खूप मोठा होता.
नेटकरी तसेच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. एका चाहत्याने लिहिले की, 'हृदयद्रावक बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती'. तर, आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये, 'सिनेसृष्टीसाठी हे नक्कीच मोठे दु:खद नुकसान आहे. त्यांचे चित्रपटसृष्टीप्रति असलेलं कार्य कायम स्मरणात राहिल'. आशा सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत विविध चित्रपट तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं. तसेच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















