एक्स्प्लोर

Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय

Govinda on Legal Notice: गोविंदाने दुसरं लग्न आणि घटस्फोटाच्या अफवांविरोधात सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.

Govinda Takes Legal Action: 90च्या दशकातील 'हिरो नंबर वन 1' (Hero No.1)  गोविंदा सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या वैवाहिक जीवनाबाबत सोशल मीडियात उलट सूलट चर्चा सुरू आहेत. अभिनेत्याचं कथित दुसरं लग्न आणि घटस्फोटाच्या संबंधित अनेक गोष्टी सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. अलिकडेच  गोविंदाची पत्नी सुनीताचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यानंतर गोविंदानेही (Govinda) सुनीताला  प्रत्युत्तर दिलं असल्याचं बोललं जात होतं.  दरम्यान, या सर्व प्रकरणांवर गोविंदाने  ठोस पाऊल (Sunita Ahuja) उचललं आहे. गोविंदाने   एका सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.  तसेच नोटीशीतून थेट इशाराही दिला आहे. नेमकं काय आहे त्या नोटीशीत? आणि नोटीशीतून अभिनेत्याने काय इशारा दिला? पाहूयात.

गोविंदाने कायदेशीर मार्गाचा अवलंबला मार्ग (Govinda Takes Legal Action Over False Marriage and Divorce)

खरंतर, अलिकडेच सोशल मीडियातून असे दावे समोर आले होते की, गोविंदाने कोमल रानीसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.   यापूर्वी सुनीता आहुजासोबत घटस्फोट झाला असल्याच्या बातम्याही सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, या बातम्या खोट्या होत्या. आता, या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर गोविंदाने कायदेशीर भूमिका घेतली आहे. गोविंदाने जारी केलेल्या पब्लिक नोटीशीमधून सोशल मिडिया संस्था, डिजिटल प्लॅटफॉर्म,   कंटेट क्रिएटर्स आणि इतर सोशल मिडिया वापरकर्त्यांना  अभिनेता किंवा त्याच्या कुटुंबाच्या संबंधित कोणतीही खोटी, बदनामीकारक,  पडताळणी न केलेली  माहिती तयार करुन प्रसारित करु नये, असा इशारा दिला आहे.

विशेषत: सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, मॉर्फ केलेले फोटो, डीपफेक आणि एआय निर्मित कंटेटबाबत कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचं सांगितलं.   नोटीशीत असेही नमूद करण्यात आले की, एआय किंवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन  मजकूर तयार करण्यासाठी किंवा  बदल करण्यासाठी आवाज,  इमेज, ओळख कोणत्याही गोष्टींचा वापर करण्यास मनाई आहे.   दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये मानहानी, गोपनीयतेचे उल्लंघन, ओळखीचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगाराशी संबंधित कायद्यानुसार,  कारवाई केली जाणार आहे.

इतकंच नाही तर, माहिती तंत्रज्ञान  2000 अंतर्गत कडक कारवाई केली जाईल.  यासह दोषी आढळल्यास, त्याच्या विरोधात 100 कोटी रुपयांपर्यंत अभिनेता नुकसान भरपाई मागू शकतो.   गरज पडली तर, बँक खाते, संपत्ती, पासपोर्टच्या संबंधित इतर बाबींसह न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहनही नोटीशीत करण्यात आले आहे. नोटीसमध्ये असेही म्हणण्यात आले आहे की, गोविंदाची प्रतिमा खराब करण्यासाठी हेतुपुरस्सर खोट्या बातम्या पसरवल्या जाऊ शकतात.   यामुळे मानसिक आणि सामाजिक हानी होत असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : 'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
Rising Summit 2026 : 'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget